तापमान ३४... चटका मात्र ३९ चा! मुंबईत रात्रही उबदार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 07:33 AM2023-05-20T07:33:14+5:302023-05-20T07:34:26+5:30

मुंबईचे कमाल तापमान ३४ अंश असले तरी येथे मोठ्या प्रमाणावर नोंदविण्यात येणारी आर्द्रता नागरिकांना घाम फोडत आहे.

The temperature is 34...but 39 Even the night is warm in Mumbai ac | तापमान ३४... चटका मात्र ३९ चा! मुंबईत रात्रही उबदार

प्रतिकात्मक फोटो

googlenewsNext

मुंबई : मुंबईसह राज्यभरातील कमाल तापमानाचा पारा चढाच असून, शुक्रवारीही राज्यातील बहुतांशी शहरे ३८ अंशाच्या आसपास नोंदविण्यात आली आहेत, तर मुंबईचे कमाल तापमान ३४ अंश असले तरी येथे मोठ्या प्रमाणावर नोंदविण्यात येणारी आर्द्रता नागरिकांना घाम फोडत आहे. कमाल तापमान उसळी घेत असतानाच २३ मे पर्यंत कोकणात असेच वातावरण राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने मुंबईकरांना दोन ते तीन दिवस तापदायक वातावरणाला सामोरे जावे लागणार आहे. 

मुंबईत रात्रही उबदार   -
- मुंबई ३४ अंशावर असली तरी आर्द्रता सरासरी ७० टक्क्यांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. तापमान वास्तविक ३९ अंश अनुभवास येत आहे. 
- रात्रही उबदार असून, रात्रीचे तापमान २७ अंशाखाली जात नसल्याचे चित्र आहे, असे वेगरिज ऑफ दी वेदरकडून सांगण्यात आले. 
- मुंबईत जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनपूर्व गडगडाट सुरू होण्याची शक्यता आहे.

कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये 
जळगाव     ४३.२ 
नांदेड     ४१.८ 
जालना     ४१ 
सांगली     ४०.६ 
सातारा     ३९.८ 
कोल्हापूर     ३९.६ 
नाशिक     ३८.६ 
पुणे     ३७.८ 
मुंबई     ३४.१

Web Title: The temperature is 34...but 39 Even the night is warm in Mumbai ac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.