महापालिकेत ठाकरे गटाला ५० जागाही मिळणार नाहीत; भाजपच्या बैठकीत आशिष शेलार यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 09:21 AM2023-05-22T09:21:13+5:302023-05-22T09:21:44+5:30

निवडणुका घ्यायला भाजप का घाबरत आहे?  भाजपला आम्ही ६० वर ऑलआऊट करू, असा दावा खा. संजय राऊत यांनी केला होता.

The Thackeray group will not even get 50 seats in the Municipal Corporation; Ashish Shelar's claim in BJP meeting | महापालिकेत ठाकरे गटाला ५० जागाही मिळणार नाहीत; भाजपच्या बैठकीत आशिष शेलार यांचा दावा

महापालिकेत ठाकरे गटाला ५० जागाही मिळणार नाहीत; भाजपच्या बैठकीत आशिष शेलार यांचा दावा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मागील २५ वर्षांत मुंबईकरांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आणि त्यांच्या शिवसेनेला प्रत्येक निवडणुकीत नाकारले. कायम घरचा रस्ता दाखवला. परंतु आमच्या समर्थनामुळे तुमचे आकडे खाली जात असतानाही तुम्ही खुर्च्या उबवत होता. कारण हिंदुत्वासाठी आम्ही तुम्हाला समर्थन देत होतो. आता परिस्थिती बदलली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट ५०चा आकडाही पार करू शकणार नाही, असा दावा मुंबई भाजप कार्यकारिणी बैठकीत भाजप मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केला.

निवडणुका घ्यायला भाजप का घाबरत आहे?  भाजपला आम्ही ६० वर ऑलआऊट करू, असा दावा खा. संजय राऊत यांनी केला होता. त्यावर मुंबई भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत  पडसाद उमटले. शेलार म्हणाले, १९९७ साली उद्धव ठाकरेंचीशिवसेना लढली तेव्हा १०३ नगरसेवक होते. ९७ ते २००२ या काळात हा आकडा ९७वर आला त्यानंतर ते ८४वर आले. २०१२ मध्ये, तर ही संख्या ७५वर आली. २०१७ मध्ये ८४ हा आकडा झाला. राज्यात ते सरकारमध्ये नसते तर हा आकडा ६०वर आला असता, आज तुमच्यासमोर मी भाकीत करतो की, ते मुंबई महापालिका निवडणुकीत ५० नगरसेवकांचा आकडाही पार करू शकणार नाही.

राज ठाकरे बोलतात, ते खरेच असते, असे नाही
 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद ठरविण्याच्या निर्णयावर केलेल्या टीकेला शेलार यांनी प्रत्युत्तर दिले.
 पंतप्रधान मोदींनी दोन हजारांची नोट बंद करण्याचा निर्णय प्रामाणिकपणे घेतला. त्यामुळे राज ठाकरे यांना सांगणे आहे की, तुम्ही उत्तम बोलता. अभ्यास करण्याचा प्रयत्न करता. पण सगळ्याच बाबतीत तुम्ही बोलले पाहिजे आणि तुमचे बोलल्यावर ते खरे असेल, असे मानण्याचे काही कारण नाही. 
 व्यक्तिगत संबंधांमध्ये तुम्ही आमच्यावर व्यक्तिगत टीका केली तर त्याला आम्ही उत्तर देणार नाही, पण जर तुम्ही माझ्या पक्षावर आणि पक्षाच्या सर्वोच्च नेत्यावर टीका केली तर तुमच्या विरोधात बोलायला मुलाहिजा ठेवणार नाही, असे शेलार म्हणाले. 
 पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार पूनम महाजन, खासदार मनोज कोटक आदी यावेळी उपस्थित होते.

Web Title: The Thackeray group will not even get 50 seats in the Municipal Corporation; Ashish Shelar's claim in BJP meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.