Join us

दोघांच्या संसारात तिसरा; मामला फॅमिली कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 10:38 AM

आधुनिक जीवनातील गुंतागुंतीमुळे घटस्फोटांत वाढ.

मुंबई : भारतात जिथे विवाहबंधन पवित्र मानले जाते...  एक आजीवन वचनबद्धता... विवाह केवळ दोन व्यक्तींचा नाहीतर दोन कुटुंबाचे मनाेमिलन मानले जाते. तथापि, आधुनिक जीवनातील गुंतागुंतीमुळे घटस्फोटाचे प्रमाण वर्षानुवर्षे सातत्याने वाढत आहे. गेल्या तीन वर्षात मुंबईतील कुटुंब न्यायालयातही २९-३० हजारांच्या आसपास घटस्फोटाशी संबंधित प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. 

मुंबईत घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. धकाधकीचे जीवनात संवादाचा अभाव, कामाचा तणाव, व्यभिचार, घरगुती वाद अशी अनेक कारणे घटस्फोटाला कारणीभूत ठरत आहेत. विशेषतः व्यभिचार वाढत आहे. कामाचे तास वाढल्याने  जोडीदाराला वेळ देण्यास मिळत नाही. घराच्या बाहेरच जास्त वेळ असल्याने तिथलीच व्यक्ती आवडली की त्याच्याबरोबर विवाहबाह्य संबंध ठेवले जातात. आजकाल हे सर्वसामान्य मानण्यात आले आहे. विवाहित असलेल्या व्यक्तीशी प्रेमसंबंध ठेवू नये, असे विचार कालबाह्य मानण्यात येतात. त्यामुळेही घटस्फोटाच्या आकडेवारीत भर पडत आहे, असे ॲड. वंदना काळे यांनी सांगितले. 

अलीकडे जोडीदाराचे पटत नसेल तर त्याला समजण्यात जास्त कालावधी न घालवता लग्नाच्या दुसऱ्या-तिसऱ्या महिन्यातच घटस्फोट घेण्याची तयारी केली जाते. कारण समजावण्यात कोण वेळ घालवणार?  कामाचे ओझे इतके आहे की, साथीदाराला समजावून घेण्यासाठी वेळ नाही. त्यापेक्षा झटपट घटस्फोट घ्या आणि दुसऱ्या विवाहाला मोकळे व्हा, असाच आजकालच्या तरुणांचा समज आहे.- ॲड. सुरेखा बेळे

२९,९२७ प्रकरणे :

काही वर्षांपासून मुंबई कुटुंब न्यायालयात प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी मुंबई कुटुंब न्यायालयात २९,९२७ प्रकरणे दाखल करण्यात आली. 

 घटस्फोटासह देखभालीचा खर्च, मुलांचा ताबा यांसारख्या अर्जांचाही समावेश आहे.  न्यायाधीश कमी पडू लागले आहेत म्हणूनच काही महिन्यांपूर्वी सरकारने १७ कुटुंब न्यायालये वाढविण्याचा निर्णय घेतला.

 कोरोनानंतर घटस्फोटाची अनेक विचित्र कारणे समोर येऊ लागली. 

टॅग्स :घटस्फोटन्यायालय