बोरिवली आर्ट फेस्टिव्हलची सांगता
By मनोहर कुंभेजकर | Published: March 1, 2024 05:09 PM2024-03-01T17:09:37+5:302024-03-01T17:09:54+5:30
अथर्व फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही खादी महोत्सव यशस्वीरित्या केला.
मुंबई : बोरिवली स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन आणि अथर्व फाउंडेशन यांनी स्वदेशी आणि स्वावलंबनाचा स्वीकार करण्यासाठी आणि आपली संस्कृती आणि कलेचा प्रचार करण्यासाठी तीन दिवसीय "बोरिवली आर्ट फेस्टिव्हल"ची नुकतीच यशस्वी सांगता झाली. बोरीवलीकरांचा या आर्ट फेस्टिव्हलचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
बोरिवलीचे भाजप अध्यक्ष आमदार सुनील राणे (अध्यक्ष, अथर्व फाऊंडेशन) यांच्या संकल्पनेतून व्हिलेज आर्ट अँड कल्चर सेंटर, शिंपोली व्हिलेज, बोरिवली पश्चिम येथे हा फेस्टिव्हल संपन्न झाला. बोरिवली आर्ट फेस्टिव्हल - डिझाईन, क्राफ्ट आणि कल्चर' मध्ये शिल्पकला, चित्रकला, कार्यशाळा, टॉक शो, नाटक, कथ्थक, भरतनाट्यम, संगीत, गिटार, बॉलीवूड नृत्य, बॉलीवूड गायन, बासरी, पाश्चात्य गायन यांसारख्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता. आमदार सुनील राणे, वर्षा राणे, माजी नगरसेवक प्रवीण शहा यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
आमदार सुनील राणे म्हणाले की, अथर्व फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही खादी महोत्सव यशस्वीरित्या केला, महिलांचा सन्मान केला, लष्करी जवानांसाठी कार्यक्रम आयोजित केले. बोरिवली ही संतांची, कलाप्रेमींची आणि साहित्यिकांची भूमी आहे. आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा, वैविध्यपूर्ण परंपरा आणि कलात्मक कलागुणांचे प्रदर्शन करून आपल्या संस्कृती आणि कलांचे संगोपन करणे आणि प्रतिभावान कलाकारांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या कला महोत्सवाच्या आयोजनाचा मुख्य उद्देश होता.येथे संगीत, नृत्य, कला प्रदर्शन आणि पारंपारिक हस्तकलेचे प्रदर्शन आयोजित केले होते.