मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने पर्यटनावर बंदी घातल्याने फेरीवाले तसेच छोट्या-मोठ्या दुकानदारांचा व्यवसाय तोट्यात आला आहे. याचाच परिणाम म्हणून फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर अनेकांवर मुंबई सोडून आपल्या राज्यात जाण्याची वेळ आली आहे. आता सर्व काही सुरू होत असेल तर सरकारने पर्यटनस्थळांवरील बंदीदेखील हटवावी, अशी मागणी फेरीवाले करत आहेत.
अनिल मंडन गेले २० वर्षे जुहू चौपाटीवर चहा विकण्याचा व्यवसाय करतात. मात्र, यावेळी सरकारने पर्यटनस्थळांवर बंदी घातल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अनिल यांच्या म्हणण्यानुसार, आमचा संपूर्ण व्यवसाय हा तोट्यात आला आहे. सध्या भीक मागायची वेळ आली आहे. सरकारने काही काळासाठी निर्बंध हटवले होते. त्यावेळी आमच्यासाठी आशेचा किरण होता. मात्र, सरकारने परत एकदा पर्यटनस्थळावर निर्बंध घातल्याने आमचा संपूर्ण धंदा हा मोडकळीस आला आहे. आम्ही दिवसाला ४०० ते ५०० रुपये कमावत असू, मात्र आता १०० रुपये धंदा होणेदेखील कठीण आहे.
व्यवसाय करायचा कसा?nकोरोनापूर्वी चौपाटी तसेच पर्यटनस्थळांवर हजारोंची उलाढाल होत असे. थंडीच्या महिन्यात अनेक पर्यटक या स्थळांवर गर्दी करत असत. मात्र सरकारने परत एकदा निर्बंध लादल्याने व्यवसाय करायचा कसा हा प्रश्न फेरीवाल्यांसमोर आहे.nबहुसंख्य फेरीवाले हे उत्तर प्रदेश, बिहार, कोलकाता अशा अनेक राज्यातून मुंबईसारख्या शहरात वास्तव्यास असतात. nपैसेच न मिळल्यामुळे वास्तव्याचा प्रश्नदेखील त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
छोटे-मोठे दुकानदार संकटातमुंबईमध्ये जुहू चौपटी, गिरगाव आणि अनेक पर्यटनस्थळे बंद असल्याने सर्वच फेरीवाले तसेच छोटे मोठे दुकानदार हे संकटात आहेत. पर्यटकांना बंदी असल्याने प्रवेश मिळत नाही. मुंबईमध्ये सर्वच पर्यटनस्थळांवर पोलिसांचा पहारा असल्याने फेरीवाले येथे येण्यास धजावत आहेत. ते इतरत्र व्यवसाय करण्याचे मार्ग शोधत आहेत.
nकोरोनाच्या काळात फेरीवाल्यांवर भीक मागण्याची वेळ आली आहे. काही सामाजिक संस्थांनी मदतीचा हात दिला. मात्र, अजूनही निर्बंध असल्याने फेरीवाल्यांना त्यांच्या राज्यात परतण्याशिवाय कोणताही मार्ग दिसेनासा झाला आहे.
nबिहारमधून आलेले आणि सध्या कोळीवाडा येथे अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेले महेशकुमार प्रसाद म्हणाले की, व्यवसायातून पैसे मिळत नसल्याने घरभाडे वेळेवर भरता येत नाही. सरकारने काही काळासाठी निर्बंध हटवले होते. त्या काळात वाटले की, मी परत एकदा पैसे कमावून घरभाडे भरू शकतो. मात्र, परत एकदा निर्बंध लादल्याने होती नव्हती ती आशादेखील लोप पावली. मालकाने परिस्थिती समजून राहू दिले. मात्र, मालकदेखील हे किती काळ सहन करणार हे असेच चालले तर मला माझ्या घरी परतावे लागेल. सरकारने आता सर्व काही सुरळीत होत आहे तर पर्यटनस्थळांवरील बंदी हटवली पाहिजे.