पर्वणी : आज दिसणार खंडग्रास सूर्यग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 08:17 AM2022-10-25T08:17:40+5:302022-10-25T08:17:56+5:30

हे खंडग्रास सूर्यग्रहण भारतासह आशिया खंडाचा पश्चिम व मध्य भाग, संपूर्ण युरोप आणि आफ्रिका खंडाच्या काही भागातून दिसणार आहे. 

The total solar eclipse will be seen today | पर्वणी : आज दिसणार खंडग्रास सूर्यग्रहण

पर्वणी : आज दिसणार खंडग्रास सूर्यग्रहण

googlenewsNext

मुंबई : ऐन दिवाळीत खंडग्रास सूर्यग्रहणाचा अनोखा योग उद्या मंगळवारी अनुभवता येणार आहे. या वर्षातले हे शेवटचे ग्रहण असल्याने खगोलप्रेमींसाठी ही पर्वणी असणार आहे. पुढील सूर्यग्रहण पाच वर्षांनी म्हणजेच २ ऑगस्ट २०२७ मध्ये दिसणार आहे. हे खंडग्रास सूर्यग्रहण भारतासह आशिया खंडाचा पश्चिम व मध्य भाग, संपूर्ण युरोप आणि आफ्रिका खंडाच्या काही भागातून दिसणार आहे. 

मुंबईतून पाहिल्यास सायंकाळी ४:४९ वाजता सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. ग्रहण मध्य सायंकाळी ५.४३ वाजता होईल. त्यावेळी चंद्रबिंब सूर्यबिंबाचा ३६ टक्के भाग झाकून टाकणार आहे. ग्रहण सुटण्याआधीच सायंकाळी ६:०८ वाजता सूर्यास्त होईल.सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. सूर्यग्रहणाच्या वेळी डोळ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे सूर्यग्रहण थेट पाहू नये.
 

Web Title: The total solar eclipse will be seen today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.