मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत

By जयंत होवाळ | Published: September 21, 2024 02:29 PM2024-09-21T14:29:27+5:302024-09-21T14:29:52+5:30

महानगरपालिकेने बजावलेल्या निष्कासन नोटीसनंतर विश्वस्तांनी केलेली लेखी विनंती प्रशासनाकडून मान्य

The trustees sought a deadline to remove the encroached construction of the mosque on their own, Dharavi | मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत

मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत

मुंबई : धारावी येथील ९० फूट रस्त्यावरील अतिक्रमित मशिदीचे बांधकाम काढण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने संबंधितांना नोटीस बजावली होती. तसेच या नोटीसीनुसार कारवाई हाती घेतली होती. 

तथापि, सदर ठिकाणचे अतिक्रमित बांधकाम काढण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने चार ते पाच दिवसांची मुदत द्यावी. या मुदतीच्या कालावधीत स्वतःहून बांधकाम हटवण्यात येईल, अशी लेखी विनंती मशिदीच्या विश्वस्तांनी महानगरपालिकेचे परिमंडळ २ चे उपआयुक्त आणि जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्तांकडे केली आहे.

संबंधितांनी स्वतःहून बांधकाम हटवण्याची लेखी विनंती केल्याने महानगरपालिका प्रशासनाने ही विनंती मान्य केली आहे. ठरल्या मुदतीत हे अतिक्रमित बांधकाम काढून टाकावे, असे निर्देशही विश्वस्तांना देण्यात आले आहेत, असे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

Web Title: The trustees sought a deadline to remove the encroached construction of the mosque on their own, Dharavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई