Join us

आरेच्या जंगलातून उगम पावणाऱ्या वालभाट नदीला मिळणार गतवैभव

By मनोहर कुंभेजकर | Published: November 11, 2023 5:20 PM

वालभाट नदीला गतवैभव पाप्त करण्यासाठी या नदीचे पुनरूज्जीवन व सुशोभिकरणाचे काम  सुद्धा त्या अंतर्गत घेण्यात आले आहे.

मुंबई-मुंबई महापालिकेच्या नदी पुनरुज्जीवन व सुशोभीकरण प्रकल्प अंतर्गत अनेक नद्यांचे पुनरुज्जीवन सुरू असून गोरेगाव (पूर्व) आरे जंगलातून उगम पावणारी वालभाट नदीचे नाल्यात रूपांतर झाले आहे.

नदीमध्ये  झालेले अतिक्रमण, भराव काढून टाकणं नदीचं पात्र रुंद करणे, त्याच्यासोबत नदीच्या दोन्ही बाजूने रस्त्याची व्यवस्था करणे,  झाडे लावून त्या ठिकाणी  सुशोभीकरण करणे, लहान मुलांसाठी चिल्ड्रन्स भाग इतकंच नव्हे तर नदीमध्ये फिरण्यासाठी बोटिंगची व्यवस्था अशा अनेक गोष्टी  समाविष्ट आहेत. येत्या काही वर्षांमध्ये या सगळ्या नाल्याचा रूपांतर नदीमध्ये होणार असून वालभाट नदीला गतवैभव पाप्त करण्यासाठी या नदीचे पुनरूज्जीवन व सुशोभिकरणाचे काम  सुद्धा त्या अंतर्गत घेण्यात आले आहे. त्यामुळे वालभाट नदीला गतवैभव मिळणार आहे.

या सुशोभीकरणचा पाहिला टप्प्यातील वालभाट नदी पुनरुज्जीवन प्रकल्प अंतर्गत एसटीपी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते गोरेगाव पूर्व प्रभाग 52 गोकुळधाम धीरज वैली येथे पार पडला. या प्रभागाच्या माजी नगरसेविका  प्रिती सातम यांनी या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला होता. 

खासदार शेट्टी म्हणाले की,सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, पर्यावरण व नदीचे संवर्धनासाठी खूप गरजेचा आहे.या वेळी त्यांनी सातम यांच्या कामाचे कौतुक करून आपल्या लहानपणी दहिसर, पोइसर या नद्या राष्ट्रीय उद्यानातून निघताना किती स्वच्छ असायच्या याचा अनुभव सांगून पुन्हा एकदा वालभाट सारख्या नद्यांना त्यांचे मूळ स्वरुप प्राप्त होणार असल्या बद्धल समाधान व्यक्त केले. त्याच पद्धतीने लोकप्रतिनिधीनी व नागरिकांनी या सर्व कामावर लक्ष ठेऊन ते वेळेत कसे पूर्ण होईल याची खात्री करावी अशी सूचना त्यांनी केली.

प्रिती सातम यांनी प्रकल्पाची माहिती देताना सांगितले की, वालभट नदीला आपलं मूळ रूप प्राप्त करून देण्याचा जो प्रकल्प महापालिकेने हाती घेतलेला आहे त्याच्या अंतर्गत आरेच्या जंगलामधून निघून ओशिवरा खाडीला मिळणारी ही वालभाट नदी ज्याला आपण म्हणतो वालभट नाला म्हणतो त्या नदीचं सुशोभीकरण- पुनरुज्जीवन कामाची सुरुवात झाली आहे. येत्या काही वर्षांमध्ये या सगळ्या नाल्याचा रूपांतर नदीमध्ये होणार असून आणि आपल्या पुढच्या पिढीला आणि आपल्या सर्वांनाच त्याचा लाभ घेता येईल.

या प्रसंगी भाजपचे वार्ड 52 मधील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :मुंबईआरे