फॉक्सकॉनचा अहवाल फुटला, पुण्याची जमीन योग्य; गुजरातची अयोग्य, प्रकल्प तरीही तिकडेच गेला!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 01:52 PM2022-09-14T13:52:18+5:302022-09-14T14:20:47+5:30

सेमी कंडक्टर धोरण असलेलं एकमेव राज्य असल्यानं गुजरातला पसंती दिल्याचं सांगितलं जात आहे.

The Vedanta-Foxconn report mentions that the site of Talegaon in Maharashtra is suitable for the project. | फॉक्सकॉनचा अहवाल फुटला, पुण्याची जमीन योग्य; गुजरातची अयोग्य, प्रकल्प तरीही तिकडेच गेला!

फॉक्सकॉनचा अहवाल फुटला, पुण्याची जमीन योग्य; गुजरातची अयोग्य, प्रकल्प तरीही तिकडेच गेला!

googlenewsNext

मुंबई- वेदांता-फॉक्सकॉन ग्रुपचा १ लाख ५४ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. या प्रकल्पातून १ लाख नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या. सेमीकंडक्टर निर्मितीचा (vedanta semiconductor) हा प्रकल्प गुजरातला स्थापन करण्यासंदर्भात वेदांत-फॉक्सकॉन ग्रुप आणि गुजरात सरकारमध्ये करार झाला आहे. 

महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर २६ जुलै २०२२ रोजी नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या कंपनीबरोबर या प्रकल्पाबाबत चर्चा केली होती. मात्र, त्यानंतर मंगळवारी कंपनीने अचानक हा प्रकल्प गुजरातला होणार असल्याचे जाहीर केले. या घडामोडीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना लक्ष्य करत आहेत. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 

फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून थेट गुजरातला; कंपनीच्या चेअरमन यांनी दिली मोजकीच प्रतिक्रिया

एका मराठी वृत्तवाहिनीच्या वृत्तानूसार, सदर प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील तळेगावची साईट योग्य असल्याचा उल्लेख वेदांता-फॉक्सकॉनच्या अहवालमध्ये नमूद करण्यात आला आहे. तर  गुजरातमधील 'ढोलेरा'ची साईट प्रकल्पासाठी अयोग्य असल्याचाही उल्लेख या अहवालामध्ये आहे. वेदांता-फॉक्सकॉनच्या अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी या प्रकल्पाबाबत एक सर्व्हे केला होता. त्यावेळी त्यांनी जागेबाबत निरिक्षण करुन अहवाल सादर केला होता. त्यामध्ये सदर प्रकल्पाबाबत मत मांडलं होतं. 

सेमी कंडक्शन धोरण असलेलं एकमेव राज्य असल्यानं गुजरातला पसंती दिल्याचं सांगितलं जात आहे, आणि याच एका कारणामुळे हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून निसटल्याचं सांगण्यात येत आहे. गुजरातनं सेमी कंडक्शन धोरण बनवलं, असं धोरण बनवणारं देशातील ते एकमेव राज्य आहे. या धोरणाअंतर्गत गुंतवणूक यावी म्हणून स्टेट इलेक्ट्रॉनिक मिशन स्थापन केलं. या मिशन अंतर्गत येणाऱ्या कंपन्यांना ज्या सुविधा द्यायच्या त्याच्या मान्यता बजेटमध्ये घेतली. गुजरात सरकार गेल्या फेब्रुवारीपासूनच गुंतवणुकीसाठी तयार या पॉलिसीमुळे सेमी कंडक्टर बनवणाऱ्या कंपन्यांनी गुजरात सरकारशी संपर्क साधला. 

गुजरातनं फॉक्सकॉनला काय दिलं?, महाराष्ट्र इथे मागे पडला, नाहीतर ऑफर काही कमी नव्हती!

मंगळवारी माध्यमांशी बोलताना उद्योगांबाबत केंद्रातील नेत्यांशीही बोलणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरुन बातचीत केल्याची माहिती समोर येत आहे. काल रात्री उशीरा दोघांमध्ये संवाद झाला. महाराष्ट्राला उद्योग-प्रकल्प आणि गुंतवणुकीबाबत सहकार्य करा, अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदींना केली आहे. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याच्या पार्श्वभूमीर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. 

उद्योग-प्रकल्प अन् गुंतवणुकीबाबत महाराष्ट्राला सहकार्य करा; एकनाथ शिंदेंचा थेट PM मोदींना फोन

शक्य त्या सर्व ऑफर दिल्या होत्या- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

शिवसेना-भाजप युतीचे नवे सरकार स्थापन होऊन दोनच महिने झाले आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांताचे मालक अनिल अग्रवाल, फॉक्सकॉन आणि केपीएमजी यांच्यासोबत एक बैठक घेतली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. यावेळी सरकारकडून ज्या काही सवलती देणे शक्य आहे, त्या सर्व दिल्या जातील. तळेगावजवळील ११०० एकर जमीनही आम्ही देऊ केली होती. ३० ते ३५ हजार कोटींची सवलतीसह सब्सिडी, अन्य बाबी सरकारच्यावतीने ऑफर करण्यात आल्या होत्या, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 

Web Title: The Vedanta-Foxconn report mentions that the site of Talegaon in Maharashtra is suitable for the project.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.