अल्पसंख्याक समाजाची मते ठरणार महत्त्वाची, कीर्तिकर की वायकर कोण जिंकणार?

By मनोहर कुंभेजकर | Published: May 22, 2024 04:17 PM2024-05-22T16:17:21+5:302024-05-22T16:17:40+5:30

मुंबई उत्तर पश्चिममध्ये संथ गतीने मतदान सुरू होते. अनेक मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा होत्या. परिणामी, एक तासाहून अधिक वेळ मतदानाला लागत होता. पंखे, पाण्याचीही योग्य व्यवस्था नव्हती. मतदान केंद्रात सेल्फी पॉइंट होता. मात्र, मतदान केंद्रावर मोबाइल न्यायला परवानगी नव्हती.

The votes of the minority community will be important, who will win Kirtikar or Vaikar? | अल्पसंख्याक समाजाची मते ठरणार महत्त्वाची, कीर्तिकर की वायकर कोण जिंकणार?

अल्पसंख्याक समाजाची मते ठरणार महत्त्वाची, कीर्तिकर की वायकर कोण जिंकणार?

मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात ५३.६७ टक्के मतदान झाले. या मतदार संघात खरी लढत उद्धवसेनेचे महाविकास आघाडीचे अमोल कीर्तिकर आणि महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्यात आहे. यावेळी अल्पसंख्याक समाज मोठ्या संख्येने मतदानाला उतरला. तर, कीर्तिकर यांच्यासाठी उद्धवसेनेने आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी लावलेली ताकद आणि गेली ७० दिवस केलेला  नियोजनबद्ध प्रचार यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे.

मुंबई उत्तर पश्चिममध्ये संथ गतीने मतदान सुरू होते. अनेक मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा होत्या. परिणामी, एक तासाहून अधिक वेळ मतदानाला लागत होता. पंखे, पाण्याचीही योग्य व्यवस्था नव्हती. मतदान केंद्रात सेल्फी पॉइंट होता. मात्र, मतदान केंद्रावर मोबाइल न्यायला परवानगी नव्हती. मतदार यादीत अनेकांचे फोटो नसल्याने त्यांची नावे मतदार यादीतून गायब झाली होती. काही केंद्रांवर मतदार आणि निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडली. जोगेश्वरी पश्चिम, बेहराम बाग येथील एच.के.कॉलेज येथे सकाळी ईव्हीएम मशिन एक तास बंद होते. वर्सोवा येथील यारी रोड मिल्लतनगर, अंधेरी-जुहू गल्ली, गिल्बर्ट हिल, बेहराम बाग, जोगेश्वरी, अंधेरी स्टेशन परिसरात मतदान केंद्रावर गर्दी होती.

शाब्दिक वाद
 गोरेगाव पूर्वे, आरे डेअरीसमोरील  मतदार केंद्रात निवडणूक अधिकारी आणि शिंदे सेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्यामध्ये वाद झाला. मतदान केंद्रात आल्यानंतर मला तुमचा मोबाइल जप्त करू. तुम्हाला बाहेर काढू. तुम्हाला अटक करू, असा दमच संबंधित निवडणूक अधिकाऱ्याने दिल्याचे वायकर यांचे म्हणणे आहे. वायकर यांनी तशी तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे.

पोलिसांनी भरले कुलरमध्ये पाणी! 
मालाड पूर्व येथील संस्कार कॉलेजमध्ये बंदोबस्त सांभाळत कूलरमध्ये पाणी भरताना पोलिस कर्मचारी दिसले. उकाड्याने हैराण होऊनही काही काळ पंखे बंद करण्याची वेळ पोलिसांवर आली होती.

विधानसभानिहाय मतदान 
मतदारसंघ      २०१९      २०२४ 
जोगेश्वरी पूर्व     १६८९३६      १६६७७६ 
 दिंडोशी      १५९२१९     १६२३५६ 
 गोरेगाव      १७०७८५     १७३४१७ 
वर्सोवा     १३४६५२         १४५२६८ 
अंधेरी पश्चिम     १५११०४      १४७३६८ 
अंधेरी पूर्व     १५५४४३       १५६४०५
 

Web Title: The votes of the minority community will be important, who will win Kirtikar or Vaikar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.