मुंबईत गाssरवा... चार दिवस थंडीचे; पारा १६ अंश सेल्सिअस, राज्यातही आल्हाददायक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 06:12 AM2023-01-13T06:12:45+5:302023-01-13T06:13:01+5:30

येत्या काही दिवसांत मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्हयांत आल्हाददायक हवामान राहील.

The weather department has predicted that the severity of the cold will increase further in mumbai | मुंबईत गाssरवा... चार दिवस थंडीचे; पारा १६ अंश सेल्सिअस, राज्यातही आल्हाददायक

मुंबईत गाssरवा... चार दिवस थंडीचे; पारा १६ अंश सेल्सिअस, राज्यातही आल्हाददायक

googlenewsNext

मुंबई : उत्तर भारताच्या टोकावर हिमवृष्टीमध्ये वाढ होण्याची शक्यता असून, या हिमवृष्टीमुळे गार वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे आणखी वेगाने वाहू लागतील. या गार वाऱ्यांचा प्रभाव म्हणून मध्य भारतासह उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानात आणखी घसरण होईल. परिणामी थंडीचा कडाका आणखी वाढेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली. दरम्यान, मुंबईचे किमान तापमान पुन्हा एकदा किंचित घसरले असून, गुरुवारी नोंदविण्यात आलेल्या १६ अंश तापमानामुळे मुंबईकरांना किंचित का होईना गारव्याचा आनंद लुटता येत आहे.

येत्या काही दिवसांत मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्हयांत आल्हाददायक हवामान राहील. मुंबईचे किमान तापमान १३ ते १४ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येईल. मुंबईच्या उपनगरांत म्हणजे बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि ठाणे परिसरात किमान तापमान ११ ते १२ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येईल. दिवसाचे कमाल तापमान २८ अंशांच्या आसपास राहील.

Web Title: The weather department has predicted that the severity of the cold will increase further in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.