Join us  

पश्चिम द्रुतगती महामार्ग होतोय चकाचक! पी दक्षिण विभागाची धडक स्वच्छता मोहीम

By मनोहर कुंभेजकर | Published: December 03, 2022 1:52 PM

पश्चिम द्रुतगती महामार्ग चकाचक झाल्याने गोरेगावकर आनंदित झाले आणि त्यांनी मनपाच्या कामगिरी बद्दल गौरवोद्गार काढले.

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गाची जबाबदारी ही पूर्वी एमएमआरडीएकडे होती. त्यामुळे येथील स्वच्छते बाबत आणि खड्यांबाबत सातत्याने नागरिक व प्रवाशांकडून टीका होत होती. मात्र 29 नोव्हेंबर रोजी नुकताच शासन निर्णयानुसार मुंबईचे पश्चिम दृतगती मार्ग हे एमएमआरडीएकडून मनपाला हस्तांतरित करण्यात आले. पी दक्षिण विभागाने पश्चिम दुर्तगती महामार्ग चकाचक करण्यासाठी कंबर कसली आहे. अहोरात्र येथे धडक स्वच्छता अभियान राबवल्याने दुसऱ्या दिवशी चकाचक झालेल्या या विभागातील गोरगावकर तर चकीत झाले.

उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेनुसार 'माझी मुंबई स्वच्छ मुंबई' हा उपक्रम मुंबई महानगर पालिकेतर्फे १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान माझी मुंबई - स्वच्छ मुंबई हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. परिमंडळ 4 चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शना खाली पी दक्षिण विभागात स्वच्छता अभियान मोहिमेचे मराठी चित्रपट अभिनेते, आमदार तसेच शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत उदघाटन झाल होते.

परिमंडळ 4 चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शना खाली मनपाच्या  पी दक्षिण विभागाने त्यांच्या आख्यारितीत असलेल्या पश्चिम दुर्तगती महामार्गाच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारून पश्चिम द्रुतगती महामार्गाचे स्वरूप बदलणायाचा मनसूबा येथील सहाय्यक आयुक्त राजेश अक्रे यांनी बोलून दाखवला आणि प्रत्यक्ष कृतीला सुरुवात म्हणून गेल्या शुक्रवार पासून अहोरात्र पश्चिम द्रुतगती मार्गांवर स्वछता अभियान सूरू केले. दिवसा वाहतुकीची वर्दळ जास्त असल्याने सदर कामे रात्री देखील केली जात आहेत. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील असलेल्या उड्डाणंपूलाखालून सुमारे चार पाच डम्पर भरून कचरा व डेब्रिस काढण्यात आले.

पश्चिम द्रुतगती महामार्ग चकाचक झाल्याने गोरेगावकर आनंदित झाले आणि त्यांनी  मनपाच्या कामगिरी बद्दल गौरवोद्गार काढले. काही नागरिकांनी फोन करून या बद्दल समाधान व्यक्त केले असे राजेश अक्रे यांनी सांगितले. तसेच हा कार्यक्रम संपूर्ण हायवे  स्वच्छ आणि सुंदर होईपर्यंत राबविण्यात येईल असेही त्यांनी नमूद केले. 

टॅग्स :मुंबई