Join us

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम नियमानुसारच दिले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 8:41 AM

अदानी समूहाला धारावी पुनर्विकासाचे काम दिले असले तरी निविदा प्रक्रियेतील अटी व शर्ती पूर्ण केल्याशिवाय सहमती पत्र दिले जाणार नाही. हा प्रकल्प काम चालू झाल्यापासून सात वर्षांत पूर्ण होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.  

मुंबई : मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी जागतिक निविदा काढण्यात आली होती. त्यात नियमानुसारच अदानी समूहाला ही निविदा दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.  अदानी समूहाला धारावी पुनर्विकासाचे काम दिले असले तरी निविदा प्रक्रियेतील अटी व शर्ती पूर्ण केल्याशिवाय सहमती पत्र दिले जाणार नाही. हा प्रकल्प काम चालू झाल्यापासून सात वर्षांत पूर्ण होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.     सध्या अदानी समूहाची खालावलेली पत आणि त्यांच्यासमोरील आर्थिक संकट लक्षात घेता धारावी प्रकल्प कसा पूर्ण करणार, असा सवाल काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी  विचारला. यावेळी आमदार सुनील केदार यांच्यासह इतर आमदारांनीही यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला.    सरकारच्या याबाबतीतील सर्व अटी पूर्ण केल्यानंतरच अदानी समूहाला सहमती पत्र दिले जाईल, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.  

रेल्वेच्या जागेवर करणार पुनर्वसन    हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. पुनर्विकास करताना तेथील नागरिकांचे जवळपासच पुनर्वसन करावे ही एक प्रमुख मागणी होती. आता आपल्याला येथील रेल्वेची जागा मिळाली असून यासाठी ८०० कोटी रुपये राज्य सरकारने रेल्वेला दिले आहेत. त्यामुळे या जागेवर पुनर्वसन होऊ शकेल. हा प्रकल्प सात वर्षांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :मुंबई