"तेजस ठाकरे हे मुंबई, महाराष्ट्रासह देशाला दिशा देणारं नेतृत्व हे जगाला ठाऊक"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 06:12 PM2022-08-19T18:12:48+5:302022-08-19T18:13:34+5:30

मुंबईत गिरगावात शिवसेनेकडून आयोजित केलेल्या दहिहंडी उत्सवात तेजस ठाकरे यांच्या बॅनरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

"The world knows that Tejas Thackeray is the leader who gives direction to the country including Mumbai, Maharashtra Says Shivsena Pandurang Sakpal | "तेजस ठाकरे हे मुंबई, महाराष्ट्रासह देशाला दिशा देणारं नेतृत्व हे जगाला ठाऊक"

"तेजस ठाकरे हे मुंबई, महाराष्ट्रासह देशाला दिशा देणारं नेतृत्व हे जगाला ठाऊक"

Next

मुंबई - तेजस ठाकरे हे मुंबई, महाराष्ट्राला नव्हे तर देशाला दिशा देणारं नेतृत्व आहे अशा शब्दात शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी कौतुक केले आहे. गिरगावात शिवसेनेकडून दहिहंडीचं आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी लावलेल्या एका पोस्टरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत याठिकाणी तेजस ठाकरेंचा मोठा पोस्टर लावला आहे. त्यावर युवा शक्ती असा उल्लेख करण्यात आला आहे. 

मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे हे राजकारणात येतील अशी चर्चा सुरू आहे. त्यातच गिरगावात लावलेल्या या बॅनरनं तेजसच्या राजकीय एन्ट्रीचे संकेत दिलेत का? असा प्रश्न निर्माण झाला त्यावर या दहिहंडीचे आयोजक शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ म्हणाले की, तेजस ठाकरे यांची जेव्हा इच्छा असेल तेव्हा ते राजकारणात येतील. सक्रीय होतील परंतु आता त्यावर बोलू शकत नाही. मात्र ही युवाशक्ती, युवा नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर दिल्लीला प्रेरणादायी ठरेल असं नेतृत्व ठाकरे कुटुंबात आहे हे अख्ख्या जगाला माहितीये असं त्यांनी म्हटलं. 

तसेच तेजसचं राजकारणात येणे, न येणे हे तेजस ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हातात आहे. त्यांना ज्यावेळी वाटेल तेव्हा ते राजकारणात येतील. परंतु तेजस ठाकरे यांचे नेतृत्व मुंबई, महाराष्ट्रासह देशाला दिशा देणारं असेल असेल हे नक्की. शिवसेना आणि मुंबईचं नातं अतुट आहे. शिवसेनेशिवाय मुंबईकरांना पर्याय नाही. महापालिकेत शिवसेना असणारच परंतु वरळीत मोठ्या मताधिक्याने आदित्य ठाकरे निवडून येतील असा विश्वास पांडुरंग सकपाळ यांनी व्यक्त केला. 

तेजस ठाकरेंवर लवकरच युवासेनेची मोठी जबाबदारी?  
शिवसेना सध्या ऐतिसहासिक संकटात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडून पुत्र तेजस ठाकरे यांच्यावरही युवासेनेची मोठी जबाबदारी देण्यात येईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. परंतु अद्याप यावर कुणीही अधिकृत भाष्य केले नाही. मात्र दहिहंडी उत्सवात तेजस ठाकरेंचा मोठा पोस्टर पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. 

Web Title: "The world knows that Tejas Thackeray is the leader who gives direction to the country including Mumbai, Maharashtra Says Shivsena Pandurang Sakpal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.