जखम चिघळणार नाही, लवकर बरी होणार! बँडेजपेटंटसाठी अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 12:17 PM2022-06-09T12:17:27+5:302022-06-09T12:17:47+5:30

Mumbai : आता मधुमेही रुग्णांच्या जखमांवर तसेच खोल जखम असणाऱ्यांवर या बँडेजचा प्रयोग करण्यात येणार असल्याचे आयआयटी मुंबईच्या प्राध्यापिका  तयालीया आणि  टीमने सांगितले.

The wound will not heal, it will heal quickly! Application for bandage patent | जखम चिघळणार नाही, लवकर बरी होणार! बँडेजपेटंटसाठी अर्ज दाखल

जखम चिघळणार नाही, लवकर बरी होणार! बँडेजपेटंटसाठी अर्ज दाखल

googlenewsNext

मुंबई : एखाद्या अपघातात किंवा कुठल्याही प्रसंगी गंभीर जखम झाली की, लगेचच प्राथमिक उपचार म्हणून जखमेवर मलमपट्टी केली जाते. परंतु, जखमेवर बांधली जाणारी बँडेज चांगल्या दर्जाची नसेल तर जखम चिघळत जाते. परिणामी, अनेकदा जखमेत सेफ्टीकही होऊ शकते. या सर्व बाबी लक्षात घेऊन आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी गरिबांनाही सहज खरेदी करता येणारी, परवडणारी बँडेज तयार केली आहे. ही बँडेज नैसर्गिकरीत्या जखम बरी करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजेच जखम चिघळणार नाही. दरम्यान, या बँडेजच्या पेटंटसाठी अर्ज करण्यात आला आहे.

पॉलिमरचा वापर करून दोन स्तर असलेली ही बँडेज आहे. आयआयटी मुंबईच्या प्राध्यापिका प्रकृती तयालीया आणि त्यांच्या टीमने ही बँडेज तयार केली आहे. ही बँडेज बॅक्टेरिया किंवा जंतुरोधक असून अँटी ऑक्सिडंट तसेच दाह कमी करणारे किंवा जखमेच्या वेदना कमी करणारी अशी ही बँडेज आहे. तसेच जखम लवकरात लवकर बरी होईल अशा पद्धतीने या बँडेजची रचना करण्यात आली आहे. या बँडेजमध्ये असणाऱ्या घटकांमुळे  अतिशय खोल जखमेवर ही बँडेज परिणामकारक ठरते असेही आयआयटी मुंबईच्या टीमने म्हटले आहे.

कोरोना महामारीच्या काळात एखाद्याला जखम झालीच तर त्याला उपचार घेताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. परंतु, या परवडणाऱ्या बँडेजमुळे जखम घरच्या घरीच बरी होईल अशा पद्धतीने उपचार घेता येतील. दरम्यान, बाजारात सध्या ३ हजार प्रकारच्या बँडेज उपलब्ध आहेत. परंतु, त्या सर्व अँटीसेप्टीक किंवा अँटीबायोटीक आहेत. त्यांच्यात अँटी ऑक्सिडंट किंवा दाह कमी करणारे घटक अतिशय कमी प्रमाणात आढळत असल्याचे समोर आले आहे.

बँडेज तयार करताना अनेक चाचण्या
अनेक चाचण्या करून किंवा प्रयोगांच्या माध्यमातून ही बँडेज तयार करण्यात आली आहे. आयआयटी मुंबईच्या प्रयोगशाळांंमध्ये विविध घटकांचा वापर करून परवडणारी तसेच जखम लवकर बरी करणारी ही बँडेज तयार करण्यात आली. सर्वप्रथम उंदरांवर या बँडेजचा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगात इतर बँडेजपेक्षा आयआयटीची बँडेज अधिक प्रभावी असल्याचे समोर आले. आता मधुमेही रुग्णांच्या जखमांवर तसेच खोल जखम असणाऱ्यांवर या बँडेजचा प्रयोग करण्यात येणार असल्याचे आयआयटी मुंबईच्या प्राध्यापिका  तयालीया आणि  टीमने सांगितले.

 

Web Title: The wound will not heal, it will heal quickly! Application for bandage patent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य