मुंबई : लालबाग येथील एका बांधकामाधीन इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील एका फ्लॅटमधील बांबूच्या परांचीला हात पाय बांधून लटकवलेल्या तरुणाच्या मृतदेहाचे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे. तरुणाचा मृतदेह शविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
लालबाग येथील चौत्य टॉवर, इमारत क्रमांक ७७७ मधील १२ व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ६ मध्ये ही घटना घडली. मसूदमिया उर्फ मासूममिया रमजान सरकार ( १९ ) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो कामगार होता. त्याचा भाऊ मुजाहिद रमजान सरकार (२१) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. रविवारी रात्री १० ते सोमवारी सकाळी ९ दरम्यान ही घटना घडली आहे. सोमवारी सरकार यांना त्यांचा भाऊ हॉलच्या बाहेरील बाजूस, हात पाय बांधून त्याचे गळ्यात दोरीने फास लावून जीवे ठार मारून बांबूच्या परांचीला लटकवून ठेवल्याचे दिसून आले. या घटनेने खळबळ उडाली. घटनेची वर्दी लागतच काळाचौकी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.
तरुणाचा मृतदेह खाली उतरवून केईएम रूग्णालयात नेला. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवत पोलीस अधिक तपास करत आहे. परिसरातील सीसीटिव्हीसह तांत्रीक पुराव्याच्या मदतीने अधिक तपास सुरू आहे.