थिएटर ही चिरंतन टिकणारी कला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 02:26 AM2018-04-11T02:26:13+5:302018-04-11T02:26:13+5:30
मुंबईला बॉलीवूडची नगरी म्हटले जाते. मुंबई आणि महाराष्ट्र ही भारतीय सिनेमाची जन्मभूमी आहे. इथे नाटकांना प्राधान्य दिले जाते.
मुंबई : मुंबईला बॉलीवूडची नगरी म्हटले जाते. मुंबई आणि महाराष्ट्र ही भारतीय सिनेमाची जन्मभूमी आहे. इथे नाटकांना प्राधान्य दिले जाते. समाजाच्या मनातील प्रतिबिंब हे नाटकाच्या माध्यमातून थिएटरमध्ये दाखविले जाते. चित्रपट उद्योगात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान विकसित झाले असले, तरीही थिएटरला कोणीही समाप्त करू शकणार नाही. ती चिरंतन काळ चालणारी कला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या वतीने आयोजित ८व्या थिएटर आॅलिम्पिक्सच्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. कामगार
क्रीडा भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय सांस्कृतिक
कार्य, पर्यावरण, वन राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा, थिएटर आॅलिम्पिक्स कमिटीचे अध्यक्ष थिओडोरस तेरझोपौलस, सदस्य रतन
थियाम, थिएटर आॅलिम्पिक्स २०१८च्या सल्लागार समितीचे अर्जुन देव चरण, अभिनेता नाना पाटेकर, अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी, संचालक वामन केंद्रे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक वामन केंद्रे यांनी, तर समारोप अर्जुन देव चरण यांनी केला.