अभिनेत्रीच्या पार्टीत चोरी करणारे अटकेत

By admin | Published: July 2, 2017 04:33 AM2017-07-02T04:33:10+5:302017-07-02T04:33:10+5:30

सिने अभिनेत्री उपासना सिंह हिच्या पार्टीत शिरुन पर्सची चोरी करणाऱ्या दोघा भामट्यांना वर्सोवा पोलिसांनी अटक केली आहे. वीरेंद्र व दीपक अशी

Theft of the actress | अभिनेत्रीच्या पार्टीत चोरी करणारे अटकेत

अभिनेत्रीच्या पार्टीत चोरी करणारे अटकेत

Next

लोकमत न्युज नेटवर्क
मुंबई : सिने अभिनेत्री उपासना सिंह हिच्या पार्टीत शिरुन पर्सची चोरी करणाऱ्या दोघा भामट्यांना वर्सोवा पोलिसांनी अटक केली आहे. वीरेंद्र व दीपक अशी त्यांची नावे असून हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरुन पोलिसांनी छडा लावला.
हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये काम करणाऱ्या उपासना सिंह हिने २९ जूनला @वाढदिवसानिमित्त वर्सोव्यातील ‘द व्यू थिएटर’ हॉटेलमध्ये पार्टी दिली होती. पार्टीला आलेल्या यातील गायिका हॅप्पी राय आणि मॉडेल काया शर्मा यांची पर्स घेऊन दोघेजण पळून गेले. पर्समध्ये मोबाईलसह २० हजारांहून अधिक रुपये होते. मात्र हॉटेलपासून काही अंतरावर नाकाबंदी सुरू असल्याने पर्समधील ऐवज काढून घेऊन त्या तिथेच टाकून ते पसार झाले. याप्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून चौकशीअंती दोघांना ताब्यात घेतले.

Web Title: Theft of the actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.