मेडिकलला प्रवेश देण्याच्या बहाण्याने दोघांची फसवणूक

By admin | Published: February 11, 2015 12:13 AM2015-02-11T00:13:11+5:302015-02-11T00:13:11+5:30

तेरणा मेडिकल कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन देण्याच्या बहाण्याने दोघांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Theft of both medical and medical fraud | मेडिकलला प्रवेश देण्याच्या बहाण्याने दोघांची फसवणूक

मेडिकलला प्रवेश देण्याच्या बहाण्याने दोघांची फसवणूक

Next


नवी मुंबई : तेरणा मेडिकल कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन देण्याच्या बहाण्याने दोघांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसई येथे राहणाऱ्या जेरी डायस आणि त्यांचे एक सहकारी या दोघांसोबत ही फसवणूक झाली आहे. पनवेल येथे राहणाऱ्या प्रशांत पटनाईक याच्यासोबत त्यांची ओळख झालेली. त्यानुसार प्रशांत याने सदर दोघांच्या मुलांना तेरणा मेडिकल कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेऊन देतो असे सांगितलेले. त्याकरिता दोघांकडून एकूण ५१ लाख रुपये घेतले होते. तसेच रक्कम घेतल्यानंतर प्रवेश दिल्याची बनावट पावती दिलेली. अखेर हा प्रकार उघड झाल्यानंतर त्यांनी प्रशांत याच्याविरोधात नेरुळ पोलिसांकडे तक्रार केली आहे. मात्र प्रशांत पटनाईक याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: Theft of both medical and medical fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.