कोरोना काळात चोरी, वाहन चोरीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:06 AM2021-06-18T04:06:23+5:302021-06-18T04:06:23+5:30

कोरोना काळात चोरी, वाहन चोरीत वाढ कोरोनाने वाढविली पोलिसांची डोकेदुखी! कोरोना काळात चोरी, वाहन चोरीत वाढ कोरोनाने वाढविली पोलिसांची ...

Theft in Corona period, increase in vehicle theft | कोरोना काळात चोरी, वाहन चोरीत वाढ

कोरोना काळात चोरी, वाहन चोरीत वाढ

Next

कोरोना काळात चोरी, वाहन चोरीत वाढ

कोरोनाने वाढविली पोलिसांची डोकेदुखी!

कोरोना काळात चोरी, वाहन चोरीत वाढ

कोरोनाने वाढविली पोलिसांची डोकेदुखी!

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनामुळे अनेकांवर बेरोजगारीची वेळ ओढावली. अशात चोरी, वाहन चोरीच्या घटनांत वाढ होत असल्याने मुंबईकरांबरोबर पोलिसांच्या डोकेदुखीत भर पडत आहे, तर दुसरीकडे किरकोळ कारणांतून हत्या सत्र सुरू असल्याचे चित्र मुंबईत पाहावयास मिळते आहे.

यावर्षी जानेवारी ते एप्रिल महिन्यात मुंबईत एकूण १९ हजार २१२ गुन्हे नोंद झाले. यापैकी १४ हजार ६५३ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. गेल्यावर्षी हाच आकडा १६ हजार ५१८ होता. गेल्यावर्षी लॉकडाऊनचे सुरुवातीचे मुख्यत्वेकरून एप्रिल आणि मे महिन्यात शहरातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात घट झाली. मात्र, जून महिन्यात अनलॉकचा टप्पा सुरू होताच जूनपासून गुन्ह्यांचे प्रमाण पुन्हा जैसे थे स्वरूपात आले. यात चोरी, वाहन चोरीत वाढ झाली आहे, तसेच हत्या, हत्येच्या प्रयत्नांच्या घटनाही डोके वर काढत आहेत.

यावर्षी एप्रिलपर्यंत ५० हत्येच्या, तर १२८ हत्येचा प्रयत्नांच्या घटना घडल्या. १ हजार ९८ वाहने चोरीला गेली आहेत. यापैकी अवघ्या ४०५ वाहनांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. गेल्यावर्षीच्या याच चार महिन्यांच्या तुलनेत यात, ३७३ ने वाढ झाली आहे, तर १ हजार ३८७ चोरीच्या घटनांची भर यात पडली आहे.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केल्या निर्बंधाच्या अंमलबजावणीबरोबरच विविध जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर आहे. त्यात, रस्त्यावरील गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढत असल्यामुळे पोलिसांवरचा ताण वाढत आहे.

.....

गुन्हेगारी...

२०१९ २०२० २०२१ एप्रिल

हत्या १६५ १४८ ५०

हत्येचा प्रयत्न ३४३ ३४८ १२८

दरोडे २१ १५ ७

चोरी ५,८८८ ३४३३ १३८७

वाहन चोरी २६९३ २८०१ १०९८

क्रूरतेत वाढ

मुंबईत गेल्या काही दिवसांत क्षुल्लक कारणातून हत्येच्या घटना वाढताना दिसत आहेत. यात पैशांची मागणी, अनैतिक प्रेमसंबंध, भांडण, मध्यस्थी करणे अथवा क्षुल्लक कारणातून हत्येच्या घटना घडताना दिसत आहेत.

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

चोरी, घरफोडी, तसेच वाहन चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून वेळोवेळी करण्यात येत आहे.

गुन्ह्यांत नवीन चेहरे

अशात मुंबई पोलिसांच्या कारवाईत अटक करण्यात आलेल्यांमध्ये काही नवीन चेहरे समोर येत आहेत. काही घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे यात अडकताना दिसले, तर काहीजण झटपट पैसा कमाविण्यासाठी गुन्हे करताना दिसून आले.

............................................

Web Title: Theft in Corona period, increase in vehicle theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.