अंतर्वस्त्रात लपविले चोरीचे पैसे, आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 05:02 AM2018-02-03T05:02:19+5:302018-02-03T05:02:30+5:30

चारकोप परिसरात फर्निचरच्या दुकानात चोरी करून पसार झालेल्या दोघा चोरांना एमएचबी पोलिसांनी सोमवारी ‘नो ड्रंक अँड ड्राइव्ह’ कारवाईदरम्यान पकडले. मुख्य म्हणजे, यातील एका चोराने पोलिसांना चकवा देण्यासाठी ‘अंतर्वस्त्रात’ चोरीचे पैसे लपविले होते.

 Theft hidden in the robbery, the accused detained | अंतर्वस्त्रात लपविले चोरीचे पैसे, आरोपी अटकेत

अंतर्वस्त्रात लपविले चोरीचे पैसे, आरोपी अटकेत

Next

मुंबई : चारकोप परिसरात फर्निचरच्या दुकानात चोरी करून पसार झालेल्या दोघा चोरांना एमएचबी पोलिसांनी सोमवारी ‘नो ड्रंक अँड ड्राइव्ह’ कारवाईदरम्यान पकडले. मुख्य म्हणजे, यातील एका चोराने पोलिसांना चकवा देण्यासाठी ‘अंतर्वस्त्रात’ चोरीचे पैसे लपविले होते. त्याच्या झडतीत पोलिसांना ५०० आणि २ हजार रुपयांच्या नोटा आढळून आल्या. ही रक्क म २ लाख ४ हजार ७३० रुपये इतकी होती. पोलिसांनी ती हस्तगत केली आहे.
सोमवारी एमएचबी परिसरात बोरीवली वाहतूक पोलिसांकडून ‘नो ड्रंक अँड ड्राइव्ह’ अंतर्गत कारवाई सुरू होती. त्याच दरम्यान, एका पल्सर मोटरसायकलवरून दोन इसम त्या ठिकाणी आले. इतरांप्रमाणे पोलिसांनी त्यांनाही चौकशीसाठी थांबविले. दोघांच्याही हालचाली संशयास्पद दिसल्या. दोघेही घाबरत हातातील पिशवी लपवत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्यांच्या हातातील पिशवीत तपासली असता, त्यात काही रक्क म सापडली. तेव्हा पोलिसांनी त्यातील चालकाला गाडीचे लायसन्स आणि अन्य कागदपत्रे विचारली. ते ऐकताच त्याचा दुसरा साथीदार पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे पोलिसांचा त्यांच्यावरील संशय बळावला आणि त्यांची झडती घेण्यात आली. तेव्हा त्यांच्या ‘अंतर्वस्त्रात’ पोलिसांना ५०० आणि २ हजार रुपयांचे बंडल मिळून एकूण २ लाख ४ हजार ७३० रुपये सापडले.
दोघांनीही या रकमेबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली. अखेर पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. चारकोपमधील एक फर्निचरचे दुकान फोडून त्यांनी हे पैसे पळविल्याचे तपास अधिकाºयांना सांगितले. त्यानुसार, हा परिसर एमएचबी पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने, या दोघांना त्यांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.
वैद्यनाथ मारुती सवडे (२१) आणि कुलदीप राजाराम चौधरी (२०) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. दोघे मिरा रोड परिसरातील राहणारे आहेत, अशी माहिती एमएचबी पोलिसांकडून देण्यात आली. पुढील चौकशीसाठी या दोघांना चारकोप पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Web Title:  Theft hidden in the robbery, the accused detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.