Join us

उड्डाणपूल, मेट्रो बांधकामाजवळील लोखंडी साहित्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गोवंडी, मानखुर्द व चेंबूर परिसरात मागील काही वर्षांपासून मेट्रो तसेच उड्डाणपुलांचे काम प्रगतिपथावर आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गोवंडी, मानखुर्द व चेंबूर परिसरात मागील काही वर्षांपासून मेट्रो तसेच उड्डाणपुलांचे काम प्रगतिपथावर आहे. मात्र या ठिकाणी लावण्यात आलेले बॅरिकेट्स व इतर लोखंडी साहित्यावर चोरट्यांची नजर असल्याने हे साहित्य धोकादायक स्थितीत आहे. या परिसरात गेली अनेक वर्षे मेट्रो तसेच उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. काही ठिकाणी मेट्रोचे काम गेली अनेक महिने थांबले आहे. यामुळे येथे असणारे बॅरिकेट्स तसेच इतर लोखंडी साहित्य चोरी होण्याच्या घटना वाढत आहेत.

रात्रीच्या वेळेस या बॅरिकेट्सच्या येथे मद्यपी व गर्दुल्ले नशा करण्यासाठी येतात. यावेळी येथील काही लोखंडी साहित्याची चोरी होते. त्याचप्रमाणे काही लहान मुलेदेखील दिवसाढवळ्या लोखंडाचे छोटे भाग येथून चोरून नेतात. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही भंगारवाल्यांच्या दुकानात हे साहित्य विकले जाते. विशेषतः घाटकोपर मानखुर्द लिंक मार्गावर होत असलेल्या उड्डाणपुलाच्या येथून या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत.

...................................................