Join us

जूहु इथं ड्रेनेजवरील लोखंडी झाकणाची चोरी; पालिकेची पोलिसात तक्रार

By गौरी टेंबकर | Published: February 22, 2024 11:45 AM

झाकणाच्या चोरीमुळे पावसाळ्यामध्ये मानवी जीवनाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा प्रकार करणाऱ्या व्यक्तीला लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी स्थानिकांची मागणी आहे.

मुंबई -  पालिकेच्या के पश्चिम विभागातून ड्रेनेजवरील ४ लोखंडी झाकणे पळवून नेण्यात आली. याविरोधात सदर विभागातील वॉर्ड ६७ येथे मला निसारण प्रचालन निरीक्षक सहदेव परुळेकर (४३) यांनी जुहू पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल करवला आहे.

परुळेकर यांच्याकडे के पश्चिम वॉर्ड मधील ड्रेनेज लाईन ची खराबी दुरुस्ती तसेच इतर तक्रारीबाबत निरीक्षण करून त्याचा अहवाल सादर करण्याची जबाबदारी आहे. त्यांच्या तक्रारीनुसार ६ नोव्हेंबर रोजी जुहूच्या भरूचा बाग, २० नोव्हेंबर रोजी गुलमोहर क्रॉस रोड, २९ डिसेंबर रोजी तानाजी मालुसरे रोड तर ५ फेब्रुवारी रोजी एन एस रोड गावठाण, विलेपार्ले परिसरातील गटारावरची लोखंडी झाकणे चोरीला गेली. चोरीला गेलेल्या या झाकणाची एकूण किंमत १६ हजार रुपये असून अनोळखी चोराविरोधात त्यांनी जुहू पोलिसात मंगळवारी धाव घेतली. सदर झाकणाच्या चोरीमुळे पावसाळ्यामध्ये मानवी जीवनाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा प्रकार करणाऱ्या व्यक्तीला लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी स्थानिकांची मागणी आहे.