Join us

सांताक्रुझमध्ये पालिकेच्या बॅरिकेट्सची चोरी; वाकोला पोलिसात गुन्हा दाखल 

By गौरी टेंबकर | Published: May 24, 2024 4:31 PM

याविरोधात एका खासगी कंपनीच्या पर्यवेक्षकाने तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गौरी टेंबकर, मुंबई: सांताक्रुझ परिसरात पालिकेचे लोखंडी  बॅरिकेट्स चोरून नेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याविरोधात एका खासगी कंपनीच्या पर्यवेक्षकाने तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तक्रारदार तौशिक पाटील (२४) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सांताक्रुझच्या सुंदरनगर २ याठिकाणी रस्ता काँक्रीटीकरणाचे काम सुरू होते. त्यासाठी पालिकेचे २५ बॅरिकेट्स आणून ठेवले होते. मात्र, २३ मे रोजी सकाळी ४.३० वाजता त्यांचे सहकारी समद हुसेन हे कामाच्या ठिकाणी पाहणी करत होते. तेव्हा काही अनोळखी इसम त्याठिकाणी बॅरिकेट्स पीकअप गाडीमध्ये भरताना दिसले. त्यामुळे हुसेन यांनी त्यांना जाब विचारला तेव्हा ते लोक उडवाउडवीची उत्तर देऊ लागले. त्यामुळे समद यांनी फोन करून पाटील यांना याची माहिती दिली. तेव्हा पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांना पाहताच अनोळखी इसम पीकअप गाडीतून बॅरिकेट्स घेऊन पसार झाले. पाटील यांनी त्यांचा पाठलाग केला मात्र ते सापडले नाही. त्या चोरांनी २० बॅरिकेट्स चोरल्याचे पाटील यांच्या लक्षात आले आणि याप्रकरणी त्यांनी वाकोला पोलिसात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिस