पोलीस अधिकाऱ्याच्या रायफलची चोरी

By admin | Published: October 25, 2015 03:28 AM2015-10-25T03:28:45+5:302015-10-25T03:28:45+5:30

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या रेल्वे सुरक्षा दलातील (आरपीएफ) एका साहाय्यक फौजदाराची रायफल चोरट्याने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती शिवाजी

Theft of the police officer rifle | पोलीस अधिकाऱ्याच्या रायफलची चोरी

पोलीस अधिकाऱ्याच्या रायफलची चोरी

Next

मुंबई : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या रेल्वे सुरक्षा दलातील (आरपीएफ) एका साहाय्यक फौजदाराची रायफल चोरट्याने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) रेल्वे स्थानकावर घडली आहे. १४ ते १८ क्रमांकाच्या फ्लॅटफॉर्म दरम्यान असलेल्या शौचालयातील खिडकीतून चोरट्याने ही रायफल पळविली असून सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सीएसटी स्थानकात कार्यरत असलेल्या साहाय्यक फौजदार ए.के. शर्मा सीएसटी रेल्वे स्थानकात कार्यरत आहेत. शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास फलाट क्रमांक १४ ते १८ येथील शौचालयामध्ये नैसर्गिक विधीसाठी गेले होते. त्या वेळी त्यांनी रायफल खिडकीजवळ काढून ठेवली. चोरट्याने तुटलेल्या खिडकीचा फायदा घेत त्यांची रायफल पळवली. शर्मा यांचे लक्ष जाताच त्यांनी नियंत्रण कक्षाला कळवीत शोधाशोध सुरू केली. मात्र तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. या प्रकरणी सीएसटी रेल्वे पोलिसांकडे रायफल चोरीबाबत तक्रार दिली. सीसीटीव्हीच्या मदतीने लुटारूचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Theft of the police officer rifle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.