अदानी नव्हे टीएसआयमध्ये चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:08 AM2021-01-03T04:08:38+5:302021-01-03T04:08:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दिंडोशी परिसरात अदानी कंपनीने ग्राहकांकडून बिलाची रक्कम गोळा करण्यासाठी नेमलेल्या टीएसआय या थर्ड पार्टी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिंडोशी परिसरात अदानी कंपनीने ग्राहकांकडून बिलाची रक्कम गोळा करण्यासाठी नेमलेल्या टीएसआय या थर्ड पार्टी कार्यालयात चोरी झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. त्यानुसार पोलीस संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करीत असून लवकरच आरोपीला गजाआड करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
अदानी कंपनीने टीएसआय या Kiosk ची नेमणूक केली आहे. ज्याचे पूर्ण नियंत्रण टीएसआयकडे असून त्याच्या चाव्यादेखील त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे असतात. त्यामुळे जी १६ लाखांची चोरी झाली आहे ती याच कंपनीच्या खात्यातून करण्यात आली असून, पोलीस टीएसआयच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करत असल्याचेही अदानी कंपनीचे म्हणणे आहे.
पोलिसांप्रमाणेच अदानी कंपनीकडूनही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा सल्ला त्यांना दिला गेला होता, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, याप्रकरणी ५०हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली असून लवकरच आरोपीला गजाआड करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.