‘त्यांच्या’ अटकेची पूर्ण तयारी झाली होती

By admin | Published: December 2, 2015 02:27 AM2015-12-02T02:27:21+5:302015-12-02T02:27:21+5:30

सूरज परमार आत्महत्या प्रकरणी उच्च न्यायालयाने चार नगरसेवकांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी फेटाळला. त्यांना तात्काळ अटक करण्याची पूर्ण तयारी ठाणे पोलिसांनी केली होती.

'Their' arrest was all set to be ready | ‘त्यांच्या’ अटकेची पूर्ण तयारी झाली होती

‘त्यांच्या’ अटकेची पूर्ण तयारी झाली होती

Next

- जितेंद्र कालेकर, ठाणे

सूरज परमार आत्महत्या प्रकरणी उच्च न्यायालयाने चार नगरसेवकांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी फेटाळला. त्यांना तात्काळ अटक करण्याची पूर्ण तयारी ठाणे पोलिसांनी केली होती. त्यासाठी चार पथके न्यायालय परिसरात तैनात करण्यात आली होती. मात्र, शनिवारपर्यंत चौघेही स्वत:हून पोलिसांसमोर हजर होतील, असे त्यांच्या वकीलांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे आणि कॉग्रेसचे विक्रांत चव्हाण आणि अपक्ष सुधाकर चव्हाण यांची नावे परमार यांच्या ‘सूसाईड नोट’मध्ये असल्याचे उघड झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. ठाणे न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
पोलिसांची अटक टाळण्याकरिता धडपडणाऱ्या या नगरसेवकांनी जामीन अर्जाचा ढालीसारखा वापर केल्याचे पोलिसांचे मत आहे. वारंवार सुनावणी पुढे गेली तरी दुसरीकडे पोलिसांनी चौघांच्याही बँक खात्यांची माहिती गोळा करून ती न्यायालयात सादर केली. त्यामध्ये राष्ट्रवादीचे कळवा मुंब्य्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या खात्यात नजीब मुल्ला यांच्याकडून तब्बल एक कोटींची रक्कम वळती झाल्याचे उघड झाले. त्याचबरोबर अन्य नगरसेवकांच्या बँक खात्यातूनही मोठ्या रकमा वळत्या केल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. आता या चौघांची जामिनाची मागणी टिकणार नाही, असा विश्वास पोलिसांना वाटू लागला. पोलिसांचा हा विश्वास खरा ठरला व जामीन
अर्ज फेटाळण्यापूर्वीच त्यांनी तो
मागे घेतल्याची माहिती सूत्रांनी
दिली. लागलीच या चौघांना ताब्यात घेण्याकरिता चार पथके तयार
होती.
परंतु पोलीस अटक करतील, याची कुणकुण लागल्याने
त्या नगरसेवकांच्या वकिलांनी ते शनिवारी स्वत:हून पोलिसांसमोर हजर होतील, असे सांगितले. शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यन्त सहायक पोलीस आयुक्त दिलीप गोरे यांच्या कार्यालयात आता त्यांना हजर होण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

नजीब मुल्ला यांचा राजीनामा
राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष नजीब मुल्ला यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
परमार आत्महत्येप्रकरणी नजीब मुल्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातच उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे सुपूर्द केला.

‘ती’ रक्कम नफ्याची
अटकपूर्व जामिनावर युक्तिवाद सुरु असताना, नजीब मुल्ला यांच्या बँक खात्यातून आ. जितेंद्र आव्हाड यांना १ कोटी ७० लाख रु पये दिल्याची माहिती सरकारी वकील राजा ठाकरे यांनी दिली आहे. मात्र, ही रक्कम मेसर्स ड्रीम होम या कंपनीच्या नफ्याची असल्याचे स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्राद्वारे दिले आहे.

Web Title: 'Their' arrest was all set to be ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.