... तर गैरहजर सरकारी डॉक्टर होणार निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 03:54 AM2018-09-02T03:54:51+5:302018-09-02T03:55:03+5:30
शासकीय आरोग्य केंद्र/रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याच्या विनापरवोनगी गैरहजेरीमुळे उपचाराअभावी रुग्णाचा वा प्रसूती दरम्यान मातेचा किंवा बाळाचा मृत्यू झाल्यास, संबंधित वैद्यकीय अधिका-यास तत्काळ निलंबित करण्यात येणार आहे.
मुंबई : शासकीय आरोग्य केंद्र/रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याच्या विनापरवोनगी गैरहजेरीमुळे उपचाराअभावी
रुग्णाचा वा प्रसूती दरम्यान मातेचा किंवा बाळाचा मृत्यू झाल्यास, संबंधित वैद्यकीय अधिकाºयास तत्काळ निलंबित करण्यात येणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने शनिवारी या बाबतचे परिपत्रक जारी केले. अशा वैद्यकीय अधिकाºयाची नोंदणी रद्द करण्याची शिफारस महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे करण्यात येणार आहे.
तसेच पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय अथवा सबळ कारणाशिवाय कर्तव्यावर गैरहजर राहणाºया वैद्यकीय अधिकाºयावर नियमानुसार शिस्तभंगविषयक कारवाई करून, त्या वैद्यकीय अधिकाºयाची वेतनवाढदेखील रोखण्यात येणार आहे.
... तोपर्यंत परिपत्रक अमलात आणू नये
आधी वैद्यकीय अधिकाºयांच्या कामाचे तास निश्चित करावेत आणि मग ड्यूटी काळात गैरहजर राहिल्यास आणि त्यामुळे होणाºया घटनांसाठी डॉक्टरांना शासनाने जबाबदार धरावे. तोपर्यंत हे परिपत्रक अंमलात आणू नये. हे अन्यायकारक परिपत्रक न्यायालयात टिकणार नाही. नावडत्या व हितसंबंधांना पूरक नसलेल्या वैद्यकीय अधिकाºयांचा पूर्वग्रहदूषित भावनेने छळ करण्यासाठी या परिपत्रकाचा गैरवापर केला जाईल.
- डॉ. राजेश गायकवाड,
अध्यक्ष, वैद्यकीय अधिकारी संघटना; मॅग्मो