...तर रिक्षामालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 06:20 AM2017-08-18T06:20:49+5:302017-08-18T06:20:52+5:30
रिक्षा आणि टॅक्सी प्रवाशांविरोधातील गुन्हे रोखण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरण थेट मुळाशी घाव घालण्याच्या प्रयत्नात आहे.
मुंबई : रिक्षा आणि टॅक्सी प्रवाशांविरोधातील गुन्हे रोखण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरण थेट मुळाशी घाव घालण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठीच राज्यात बॅच नसलेल्या चालकांना रिक्षा किंवा प्रवासी वाहन देणा-या मालकांवर कारवाई करावी, असा ठराव नुकत्याच पार पडलेल्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत मांडण्यात आला आहे.
अधिकृत रिक्षाथांबा वगळून इतरत्र धोकादायक पद्धतीने उभे राहणे, प्रवाशांकडून जादा भाडे आकारणे, गणवेश परिधान न करणे, प्रवाशांसोबत उद्धटपणे वागणे आणि प्रवासी वाहन चालवण्याचा बॅच नसणे अशा विविध गुन्ह्यांखाली चालकांवर कारवाई करण्यात यावी, असेदेखील मांडण्यात आलेल्या ठरावात नमूद केले आहे. आहे.
नियम काय सांगतो?
महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियमावली ४ मधील तरतुदीनुसार लोकसेवा चालवण्यासाठी बॅचची आवश्यकता आहे. बॅच असल्याशिवाय वाहन चालविता येत नाही.