Join us

...तर काँग्रेसचाही उमेदवार- मिलिंद देवरा; ठाकरे गट-काँग्रेस द. मुंबईत आमनेसामने

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 8:49 AM

कुणीही सार्वजनिक वक्तव्ये किंवा दावे करू नयेत, असा इशाराही दिला

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी शनिवारी गिरगावात सभा घेतली. ठाकरे गटाने दक्षिण मुंबईत आपला प्रबळ दावा केला असतानाच ठाकरे गटाने दावा केल्यास काँग्रेसही दावा करून उमेदवार निश्चित करेल. महाविकास आघाडीसाठी लोकसभा निवडणूक सोपी ठरणार नाही. तेव्हा कुणीही सार्वजनिक वक्तव्ये किंवा दावे करू नयेत, असा इशारा काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी दिला.

मिलिंद देवरा म्हणाले, माझे मतदार कार्यकर्ते समर्थक मला सकाळपासून कॉल करत आहेत. महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष दक्षिण मुंबईच्या जागेसाठी एकतर्फी दावा करत आहे,  त्यामुळे तुमची चिंता वाढणे साहजिक आहे. मला कुठल्याही प्रकारे वाद वाढवायचा नाही किंवा करायचा नाही. मागील ५० वर्षांपासून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडे आहे. देवरा परिवार हा मतदारसंघ लढवत आला आहे. खासदार असो वा नसो लोकांची कामे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात केली आहेत. कुठल्याही लाटेत आम्ही निवडून आलेलो नाही. काम आणि नात्यांनी आम्ही हा लोकसभा मतदारसंघ आतापर्यंत जिंकला आहे, असेही ते म्हणाले. भाजप-शिवसेना युतीत लढल्याने लोकसभा निवडणुकीत अरविंद सावंत हे दोनदा खासदार म्हणून दक्षिण मुंबईत निवडून आले आहेत. याआधी मिलिंद देवरा हेही या ठिकाणी खासदार होते. 

टॅग्स :मुंबईनिवडणूककाँग्रेस