Join us

...तर रिक्षाचालकांच्या विरोधात रस्त्यावर उतरू

By admin | Published: January 19, 2015 12:24 AM

कामोठे वसाहत ते मानसरोवर आणि खांदेश्वर रेल्वेस्थानक बससेवेला स्थानिक रिक्षावाल्यांनी विरोध दर्शवला आहे.

रविंद्र गायकवाड, नवी मुंबईकामोठे वसाहत ते मानसरोवर आणि खांदेश्वर रेल्वेस्थानक बससेवेला स्थानिक रिक्षावाल्यांनी विरोध दर्शवला आहे. प्रकल्पग्रस्तांचा मुद्दा पुढे करून एनएमएमटी बंद पाडण्याचा डाव रचला आहे. मात्र आर्थिकदृष्ट्या परवडणारी आणि सुरक्षित असलेली बससेवा कोणत्याही परिस्थिती सुरू राहिली पाहिजे अन्यथा आम्हालाही रिक्षाचालकांविरोधात रस्त्यावर उतरावे लागेल, अशा संतप्त प्रतिक्रि या येथील स्थानिक प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत.रिक्षाचालकांच्या विरोधामुळे गेल्या अनेक वर्षापासून खांदेश्वर आणि मानसरोवर रेल्वेस्थानकावरील प्रस्तावित असलेली अंतर्गत बससेवा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सुरू झाली. यामुळे कामोठे वसाहतीतील रहिवाशांना अत्यल्प दरात रेल्वेस्थानक गाठणे शक्य झाले. अडीच लाखांपेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या कामोठे वसाहतीत अंतर्गत वाहतुकीकरीता रिक्षाशिवाय पर्यायी व्यवस्था नसल्याने या मार्गावर एनएमएमटीसुरू करण्याची मागणी होती. ही सेवा सुरू झाली असून दररोज सुमारे दहा हजार प्रवासी प्रवास करत आहेत. याचा परिणाम व्यवसायावर होत असल्याचे कारण पुढे करीत रिक्षाचालकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्याकरीता त्यांनी सर्व प्रकल्पग्रस्त संघटनांना एकत्र करून मानसरोवर स्टेशनसमोर २७ जानेवारीला आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. यावर कामोठे वसाहतीतील प्रवासीअधिक आक्र मक झाले आहेत. जर रिक्षाचालकांनी बससेवा बंद करण्याचा प्रयत्न केला. तर आम्हीही एनएमएमटीकरीता उत्स्फूर्तपणे आंदोलन करू, अशा इशारा प्रवाशांनी दिला आहे. या लढाईत सिटीझन युनिटी फोरमही उतरली असून रविवारी अरूण भिसे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्रीराम मुल्लेमवार यांची भेट घेतली आणि बससेवा सुरू राहण्याकरीता पोलीसांना प्रयत्न करण्याची विनंती केली. एनएमएमटी, पोलीस आणि सिटीझन युनिटी फोरमने बस आणि रिक्षा थांब्याचा संयुक्त सवर््हे केला आणि दोन बस थांब्यामधील अंतर कमी करण्यात येईल का याबाबत चाचपणी करण्यात आली.