"...तर शेलार, चंद्रकांतदादा, चित्रा वाघ आणि दरेकरांना एक लाख रुपये बक्षीस देईन’’ अमोल मिटकरींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 12:01 PM2022-12-17T12:01:59+5:302022-12-17T12:06:41+5:30

MVA Mumbai Morcha: महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपाच्या नेत्यांना खुले आव्हान दिले आहे.

"...then I will give a reward of one lakh rupees to Ashish Shelar, Chandrakant Patil, Chitra Wagh and Pravin Darekar" announced Amol Mitkari | "...तर शेलार, चंद्रकांतदादा, चित्रा वाघ आणि दरेकरांना एक लाख रुपये बक्षीस देईन’’ अमोल मिटकरींची घोषणा

"...तर शेलार, चंद्रकांतदादा, चित्रा वाघ आणि दरेकरांना एक लाख रुपये बक्षीस देईन’’ अमोल मिटकरींची घोषणा

googlenewsNext

मुंबई - महापुरुषांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीसह राज्यातील विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांच्या होत असलेल्या अपमानाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने आज मुंबईत महामोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात हजारो कार्यकर्ते आणि प्रमुख नेते सहभागी होत आहेत. दरम्यान, या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपाच्या नेत्यांना खुले आव्हान दिले आहे.

अमोल मिटकरी यांनी ट्विट करत भाजपा नेत्यांना हे आव्हान दिले आहे. या ट्विटमध्ये अमोल मिटकरी म्हणतात की,  भाजपा नेते  आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, चित्राताई वाघ , प्रवीण दरेकर यांच्या घरात बाबासाहेबांचा किंवा महात्मा फुलेंचा फोटो असल्यास त्यांनी शेअर करावा व एक लाख रुपये बक्षीस माझ्याकडून रोख घेऊन जावेत. ओठावर बाबासाहेब आणि पोटात गोळवलकर असणाऱ्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये, असा टोलाही मिटकरी यांनी भाजपा नेत्यांना लगावला आहे.

दरम्यान, आज मुंबईत होत असलेल्या महाविकास आघाडीच्या महामोर्चाला मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमले आहेत. तसेच महाविकास आघाडीसह घटक पक्षांचे नेतेही जमण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान या महामोर्चामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच या मोर्चाला शरद पवार हे संबोधित करताना दिसत आहेत. 

Web Title: "...then I will give a reward of one lakh rupees to Ashish Shelar, Chandrakant Patil, Chitra Wagh and Pravin Darekar" announced Amol Mitkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.