Join us

... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 7:46 PM

या महाअधिवेशनात ढोल ताशांच्या गजरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच आपल्या भूमिकेतील बदल दाखवून दिल्याचं दिसून येतंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पहिल्यांदाच पक्षाचं अधिवेशन घेण्यात येत आहे. पुढील दोन महिन्यात मनसेच्या स्थापनेला 14 वर्षे पूर्ण होत आहेत, याची आठवणही राज यांनी आपल्या भाषणात करून दिली. तसेच, झेंडा आवडला का? असा प्रश्नही राज यांनी कार्यकर्त्यांना विचारला. तसेच, मराठीहिंदूबद्दलही आपलं मत मांडलं. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन मुंबईत पार पडत आहे. या महाअधिवेशनात ढोल ताशांच्या गजरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शिवरायांची राजमुद्रा असलेल्या मनसेच्या नव्या ध्वजाचं अनावरण करण्यात आलं. मनसेच्या राजकीय वाटचालीत प्रथमच दिवसभराचे राज्यस्तरीय महाअधिवेशन होत असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. राज यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करुनच आपला अजेंडा स्पष्ट केला. तसेच, मराठी आणि हिंदू याबद्दलही राज यांनी स्पष्टीकरण दिलंय. 

मी हिंदू आहे, मी मराठी आहे मी धर्म बदललेला नाही, असे म्हणत राज यांनी मराठीचा मुद्दा आहेच, असे ठणकावले. तसेच, ''एक सांगतो माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून त्याच्या अंगावर जाईन आणि माझ्या धर्माला नख लावायचा प्रयत्न झाला तर हिंदू म्हणून त्याच्या अंगावर जाईन'', असे म्हणत मराठी आणि हिंदूबद्दल गल्लत न करण्याचे सूचवले. तसेच, मराठीवेळी मराठी अन् हिंदूवेळी मी हिंदू असेन, असेही त्यांनी सूचवले.

टॅग्स :मुंबईराज ठाकरेमनसेमराठीहिंदू