...तर मी राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात कोर्टात जाणार'; सुहास कांदेंचा सरकारला घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 09:26 AM2023-11-02T09:26:10+5:302023-11-02T09:27:04+5:30
या वर्षी राज्यात काही ठिकाणी पाऊस कमी प्रमाणात झाला आहे.
मुंबई- या वर्षी राज्यात काही ठिकाणी पाऊस कमी प्रमाणात झाला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे, गेल्या काही दिवसांपासून अनेकांनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. दरम्यान, सरकारने मंगळवारी राज्यातील १५ जिल्ह्यातील २४ तालुक्यांत गंभीर तर १६ तालुक्यांत मध्यम दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, आता शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेस दिला आहे.
अजित पवार आजारी, मराठा समाजाने घेतला मोठा निर्णय; त्यांच्याविरोधातील आंदोलन रद्द केले
आमदार सुहास कांदे म्हणाले, महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्राच्या सर्वेच्या मदतीने जो जीआर काढला, यात फक्त मालेगाव आणि येवला ही दोन तालुकेच दुष्काळग्रस्त असल्याचे दाखवले आहे. तसं बघितलं तर नांदगाव तालुका हा सरकारच्या निर्देशात बसत होता पण नांदगाव तालुक्याचा या यादीत समावेश केला नाही. येवल्यापेक्षा जास्त दुष्काळ नांदगाव तालुक्यात आहे, जाणून नांदगाववर अन्याय केला आहे. मी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना या सर्व गोष्टी सांगितल्या आहे. येणाऱ्या काही दिवसात या तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश केला नाही तर मी केंद्र आणि राज्या सरकारच्या विरोधात हायकोर्टात जाणार आणि दुष्काळ यादीत समावेश करणार, असा इशारा आमदार सुहास कांदे यांनी दिला.
'या' तालुक्यांत दुष्काळ जाहीर
नंदूरबार (जिल्हा नंदूरबार), सिंदखेड (धुळे), चाळीसगाव (जळगाव), बुलढाणा, लोणार (बुलढाणा), भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड, मंठा (जालना), छत्रपती संभाजीनगर, सोयगाव (छत्रपती संभाजीनगर), मालेगाव, सिन्नर, येवला (नाशिक), पुरंदर सासवड, बारामती, शिरुर, दौंड, इंदापूर (पुणे), वडवनी, धारुर, अंबेजोगाई (बीड), रेणापूर (लातूर), वाशी, धाराशिव, लोहारा (धाराशिव), बार्शी, माळशिरस, सांगोला, करमाळा, माढा (सोलापूर), वाई, खंडाळा (सातारा), हातकणंगले, गडहिंग्लज (कोल्हापूर), शिराळा, कडेगाव, खानापूर विटा, मिरज (सोलापूर).