Join us

'...तर मी इथं या क्षणाला राजकारण सोडून देईन', मनसेच्या संदीप देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 12:10 PM

मनसेच्या हनुमान चालीसा पठणाच्या आंदोलनावेळी पोलिसांना गुंगारा देऊन जात असताना महिला पोलीस अधिकारी जखमी झाल्याप्रकरणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुंबई-

मनसेच्या हनुमान चालीसा पठणाच्या आंदोलनावेळी पोलिसांना गुंगारा देऊन जात असताना महिला पोलीस अधिकारी जखमी झाल्याप्रकरणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात पोलीस संदीप देशपांडे यांचा शोध घेत होते. पण न्यायालयाकडून संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झाल्यानंतर ते आज सर्वांसमोर आले. संदीप देशपांडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली आणि महिला पोलीस अधिकाऱ्याला माझा धक्का लागल्याचं एकजरी फुटेज मला तुम्ही दाखवलं तर मी या क्षणाला राजकारण सोडून देईन, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. 

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, कारण काय? पुण्यातील सभेत सविस्तर बोलणार

"एक गोष्ट लक्षात घ्या. आज तुमचे दिवस आहेत. उद्या आमचे असतील. त्यामुळे राज्य सरकारनं आधी हे असलं सूडाचं राजकारण बंद करावं. त्यादिवशी जे घडलं ते सर्वांनी पाहिलं आहे. जर त्या पोलीस भगिनी माझ्या किंवा माझ्या कारचा धक्क्यानं पडल्या असतील असं जर फुटेज तुम्ही मला दाखवलंत तर मी राजकारण सोडून देईन. माझा किंवा कार्यकर्त्यांच्या धक्क्यानं त्या पडलेल्या नव्हत्या. तरीही माझ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेला. आम्ही काय चोर किंवा दहशतवादी आहोत का? आम्हाला पकडण्यासाठी इतका दबाव पोलिसांवर का आणला जात होता?", असा सवाल उपस्थित करत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. 

'...तर राज ठाकरेंना आम्ही मदत केली असती', संजय राऊतांचं मोठं विधान!

संदीप देशपांडे यांनी यावेळी ज्या महिला पोलीस अधिकारी जखमी झाल्या होत्या त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याचाही आरोप केला. "ज्या महिला पोलीस अधिकारी जखमी झाल्यात त्यांना सक्तीच्या रजेवर का पाठवण्यात आलं? त्यांना का माध्यमांसमोर येऊ दिलं नाही? म्हणजे तुम्हाला आम्हाला अडकवायचं होतं का? शिवसेना नेमका कशाचा सूड उगवत आहे?", असं संदीप देशपांडे म्हणाले. 

राज ठाकरेंच्या घराबाहेरून गायब झाले, आज तिथेच प्रकटले; संदीप देशपांडे शिवतीर्थवर

भावना गवळी, सरनाईकांना पण फरार म्हणणार का?"आम्ही फरार होतो असं सगळे बोलत होते. फरार म्हणजे नेमकं कोण याची व्याख्या समजून घेणं गरजेचं आहे. एखादा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर जो सापडत नसतो त्याला फरार म्हटलं जातं. आम्ही भूमिगत होतो असं तुम्ही म्हणू शकता. फरार म्हणत असाल तर मग भावना गवळी, प्रताप सरनाईक आणि अनिल देशमुखांना पण तुम्ही फरार म्हटलं होतं का?", असं सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला.

 

टॅग्स :संदीप देशपांडेमनसेराज ठाकरे