Join us

"...तर गुजरातीऐवजी मराठी पंतप्रधान करुन दाखवा", मनसेचं शेलारांना प्रत्युत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 4:12 PM

मराठीवर एवढंच जर भाजपाचं प्रेम असेल तर गुजरातीऐवजी मराठी पंतप्रधान करुन दाखवा, असं प्रत्युत्तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांना दिलं आहे.

मुंबई-

मराठीवर एवढंच जर भाजपाचं प्रेम असेल तर गुजरातीऐवजी मराठी पंतप्रधान करुन दाखवा, असं प्रत्युत्तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांना दिलं आहे. शिवाजी पार्क येथील मनसेच्या दिपोत्सवाचं उदघाटन बॉलीवूडची दिग्गज जोडी सलीम-जावेद यांच्या हस्ते करण्यात आलं. याच मु्द्द्यावरुन आशिष शेलार यांनी भाजपाच्या दिपोत्सवाच्या उदघाटन कार्यक्रमात मनसेवर टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना संदीप देशपांडे बोलत होते. 

"एका दिपोत्सवाचं उदघाटन सलीम-जावेद यांच्या हस्ते झालं, तर आमच्या दिपोत्सवाचं उदघाटन मराठी कलाकारांच्या हस्ते होत आहे. मराठी कलाकार काही छोटे नाहीत", असं विधान आशिष शेलार यांनी केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना संदीप देशपांडे यांनी मराठी कलाकारांवर अन्याय होतो तेव्हा भाजपावाले कुठे जातात? असा सवाल उपस्थित केला. तसंच एवढंच जर मराठीवर प्रेम असेल तर गुजरातीऐवजी मराठी पंतप्रधान करुन दाखवा, असा टोला लगावला. मनसेच्या दिपोत्सव कार्यक्रमाला अभिनेता रितेश देशमुखही उपस्थित होता. मग तो काय तुम्हाला दिसला नाही का? असाही सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला. 

आशिष शेलार नेमकं काय म्हणाले?"एका दिपोत्सवाचं उदघाटन सलीम-जावेद या जोडीकडून करुन घेतलं गेलं. त्यांची टीमकी वाजवून घेतली. सलीम खान आणि जावेद अख्तर मोठे असतील. पण आमचे मराठी कलाकारही काही छोटे नाहीत. मराठी कलाकारांच्या उपस्थितीत दिपोत्सव झाला पाहिजे ही भाजपाची भूमिका आहे", असं आशिष शेलार म्हणाले होते. 

टॅग्स :संदीप देशपांडेआशीष शेलारमनसे