...तर केंद्रातील मोदी सरकार आधी कोसळेल, सुशांत सिंह प्रकरणावरून संजय राऊतांचा रोखठोक इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 03:06 PM2020-08-12T15:06:18+5:302020-08-12T15:12:05+5:30
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने जून महिन्यात आत्महत्या केली होती. तेव्हापासून या आत्महत्येवरून उलटसुलट दावे केले जात आहेत. तसेच या वादात भाजपानेही उडी घेतल्याने आता या आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे.
मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून सातत्याने होत असलेल्या आरोपांमुळे राज्यातील सत्ताधारी शिवसेना चांगलीच संतापली आहे. या प्रकरणावरून भाजपाकडून शिवसेनेला धारेवर धरले जात आहे. त्यामुळे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कुठल्याही एका प्रकरणावरून सरकार व्हायला सुरुवात झाली तर सर्वप्रथम केंद्रातील मोदी सरकार पडेल, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन कमळच काय कुठलेही ऑपरेशन यशस्वी होणार नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने जून महिन्यात आत्महत्या केली होती. तेव्हापासून या आत्महत्येवरून उलटसुलट दावे केले जात आहेत. तसेच या वादात भाजपानेही उडी घेतल्याने आता या आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. तसेच या प्रकरणाच्या तपासावरून मुंबई पोलीस आणि बिहार पोलीसही आमने-सामने आले आहेत.
दरम्यान, या सर्व प्रकरणाबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, सुशांतसिंह प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीस सक्षम आहेत. मात्र पोलिसांचे मनोधैर्य खच्ची करण्याची दुर्बुद्धी काहही जणांना सुचली आहे. देव त्यांना सदबुद्धी देवो. तसेच एखाद्या प्रकरणामुळे कुठलेही सरकार हे अस्थिर होत नाही. अशा प्रकारे सरकारे अस्थिर व्हायला लागली तर सर्वात आधी केंद्रातील मोदी सरकार पडेल, असा टोला राऊत यांनी लगावला.
मोदींच्या नेतृत्वाखाली देशातील प्रश्न सुटावेत, अशी आमची अपेक्षा आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह सर्वच राज्यांमधील मुख्यमंत्री मोदींच्या पाठीशी आहेत. राजकारण न करता देश पुढे जावा, अशी आमची इच्छा आहे, असेही राऊत यांनी यावेळी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता
वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी