"...तर त्यांची मुलं स्वकर्तृत्वावर विमानानं फिरतील", राज्यपालांच्या हस्ते डबेवाल्यांना सायकल वाटप  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 04:29 PM2020-10-19T16:29:55+5:302020-10-19T16:32:31+5:30

governor bhagat singh koshyari : राज्यपालांच्या हस्ते मुंबईतील निवडक डबेवाल्यांना राजभवन येथे सोमवारी (दि. १९) सायकल वाटप करण्यात आले.

"... then their children will fly by themselves", Governor distributes bicycles to boxers | "...तर त्यांची मुलं स्वकर्तृत्वावर विमानानं फिरतील", राज्यपालांच्या हस्ते डबेवाल्यांना सायकल वाटप  

"...तर त्यांची मुलं स्वकर्तृत्वावर विमानानं फिरतील", राज्यपालांच्या हस्ते डबेवाल्यांना सायकल वाटप  

Next
ठळक मुद्देश्री साई श्रद्धा प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात १२ डबेवाल्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सायकलच्या चाव्या देण्यात आल्या. श्री

मुंबई : मुंबईतील सर्व डबेवाले मेहनत करून लोकांना जेवण पोहोचविण्याचे पुण्यकर्म करीत आहेत. चांगले काम करणाऱ्याला ईश्वर नेहमी मदत करीत असतो. आज डबेवाले सायकलवरून फिरत असले. तरीही त्यांची मुले शिक्षणाच्या माध्यमातून स्वकर्तृत्वावर प्रगती करून मोटरकार व विमानाने फिरतील, असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला. 

राज्यपालांच्या हस्ते मुंबईतील निवडक डबेवाल्यांना राजभवन येथे सोमवारी (दि. १९) सायकल वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. श्री साई श्रद्धा प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात १२ डबेवाल्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सायकलच्या चाव्या देण्यात आल्या.
श्री साई श्रद्धा प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करताना राज्यपाल म्हणाले, परोपकार करण्याची क्षमता ईश्वराने केवळ मनुष्याला दिली आहे, त्याचा माणसाने सदुपयोग केला पाहिजे. आपल्या देशात गरिबात गरीब व्यक्तिमध्ये देखील आपल्या ताटातून अर्धे जेवण दुसर्‍या गरजूला देण्याची भावना आहे. अशा परोपकारी लोकांमुळेच समाज जिवंत राहतो, असे त्यांनी सांगितले.

श्री साई श्रद्धा प्रतिष्ठानचे शुभ्रांशू दीक्षित यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून प्रतिष्ठानतर्फे कोरोना काळात केलेल्या  समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. कोरोना काळात अनेक डब्बेवाल्यांच्या सायकली बंद पडून बिघडल्या व त्यांचा रोजगारही गेला. या सर्वांना पुनश्च रोजगार मिळवा या दृष्टीने सायकल वाटप करण्याचे ठरवले, असे त्यांनी सांगितले. यावेळी मुंबई डब्बावाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर उपस्थित होते. 

Web Title: "... then their children will fly by themselves", Governor distributes bicycles to boxers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.