Join us

Coronavirus:...तर मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदारांनाही कोरोनाचा धोका; विधान भवनाच्या आदेशावर कर्मचारी नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 1:18 PM

१३ जुलै रोजी विधान भवनात ५० टक्के कर्मचारी उपस्थितीबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे. आतापर्यंत विधिमंडळातील १७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे यात ४ पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांसह सर्व आमदारांच्या, मंत्र्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवरविधान भवनात ५० टक्के कर्मचारी उपस्थितीबाबत परिपत्रक काढण्यात आलेविधिमंडळातील जवळपास ७५० कर्मचाऱ्यांपैकी १७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

मुंबई – राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना अनेक शासकीय कार्यक्रम, धार्मिक सोहळे रद्द करण्यात आले आहेत, कन्टेन्मेंट झोनमधील शासकीय कार्यालयांमध्ये १० ते १५ टक्के उपस्थिती ठेवण्याचे शासनाचे आदेश आहेत. अशातच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने ५० टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह सर्व आमदारांच्या, मंत्र्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.

१३ जुलै रोजी विधान भवनात ५० टक्के कर्मचारी उपस्थितीबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे. आतापर्यंत विधिमंडळातील १७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे यात ४ पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचं पावसाळी अधिवेशन २ दिवसांपुरतं ठेवणार असल्याची शक्यता आहे. ३ ऑगस्ट रोजी पावसाळी अधिवेशन सुरु होईल. त्यामुळे अधिवेशनाच्या कामकाजासाठी कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ कमी पडत असल्याने ५० टक्के उपस्थित बंधनकारक करण्यात आली आहे.

याबाबत विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत म्हणाले की, आम्ही कर्मचाऱ्यांना एक दिवसाआड येण्यासाठी सांगितलं आहे. त्याचसोबत योग्य ती सुरक्षा बाळगण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. विधिमंडळ अधिवेशन असल्याने हा आदेश काढण्यात आला आहे. मात्र राज्य सरकारने १५ टक्क्यापेक्षा जास्त उपस्थिती असू नये असं असतानाही या निर्णयामुळे विधान भवनातील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

जवळपास ७५० कर्मचाऱ्यांपैकी १७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे, राज्य सरकारने जर १५ टक्के उपस्थिती लावण्यास सांगितले असेल तर विधिमंडळ सचिवालय ५० टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्यास बंधनकारक का करत आहे? तसेच अनेक कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेन्सने प्रवास करतानाही अडचणी येत आहे, विधिमंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी अनेकदा अत्यावश्यक कर्मचारी असतानाही रेल्वे प्रवासास अडवले जात आहे. अनेक कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत. मग स्वत: धोका पत्करुन ५० टक्के उपस्थिती लावावी असं सांगण्यात येत असल्याचं विधिमंडळ कर्मचारी युनियने नाराजी व्यक्त केली आहे. त्याचसोबत इतक्या संख्येने कर्मचारी उपस्थित राहिल्याने अधिवेशनासाठी येणाऱ्या मुख्यमंत्री, आमदार आणि मंत्र्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न उपस्थित होत आहे.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

'त्या’ बलात्काऱ्याला वैद्यकीय उपचार देऊ नका अन् त्यातूनही वाचलाच तर चौकात फाशी द्या; मनसे आक्रमक

मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर हताश बापाची विनवणी; माझ्या मुलाला ताप आहे, मला कोरोना झालाय तरीही...

…तर राज्याच्या आरोग्य यंत्रणेला आणखी काय हवं?; देवेंद्र फडणवीसांचं शिवसेनेकडून तोंडभरुन कौतुक

लेहसोबत आता समुद्रात भारताने दाखवली ताकद; चीनला दिला इशारा

 कोरोनावरील आणखी एक लस मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात; वैज्ञानिकांना मोठं यश

टॅग्स :उद्धव ठाकरेराज्य सरकारमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसविधान भवन