"संपूर्ण मुंबई अनलॉक करण्यास काहीच हरकत नाही; पण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 04:10 PM2020-07-26T16:10:29+5:302020-07-26T17:06:18+5:30

चेस द व्हायरस - ट्रेसिंग – ट्रॅकींग – टेस्टींग – ट्रिटिंग या चतु:सूत्रीची अंमलबजावणी यशस्वीपणे 

... then unlock the whole of Mumbai | "संपूर्ण मुंबई अनलॉक करण्यास काहीच हरकत नाही; पण..."

"संपूर्ण मुंबई अनलॉक करण्यास काहीच हरकत नाही; पण..."

Next

मुंबई : संपुर्ण मुंबई अनलॉक करण्यास काहीच हरकत नाही. मात्र सध्या असे करणे उचित होणार नाही. कारण जोवर मुंबई महानगर प्रदेशातील कोरोना परिस्थितीवर संपुर्णपणे नियंत्रण मिळत नाही तोवर संपुर्ण लॉकडाऊन उठविता येणार नाही, असे वक्तव्य मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केले आहे. मुंबई शहरासह उपनगरात कोरोनावर विजय प्राप्त केला जात असून, याबाबतची माहिती आयुक्त विविध माध्यमांद्वारे प्रसार माध्यमांना देत आहेत. अनलॉकबाबतही चहल यांनी ही माहिती दिली असून, कोरोनाला हरविण्यासाठी आपण प्रत्येक स्तरावर वेगाने कार्यरत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

मुंबई महापालिकेच्या आयुक्तांच्या दाव्यानुसार, गेल्या दोन महिन्यांचा विचार केला तर मुंबईत दर दिवशी सरासरी १ हजार ७०० पेक्षा रुग्ण वाढलेले नाहीत. त्यामुळे मुंबई अनलॉक करता येईल. मात्र मुंबई महानगर प्रदेशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशावेळी हे प्रमाण कमी झाले पाहिजे. आता विचार केला तर मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा दर एक टक्का आहे. जर मुंबईप्रमाणे मुंबई महानगर प्रदेशातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली तर रुग्णवाढीचा दर ६४ दिवसांवर येईल. त्यामुळे संपुर्ण अनलॉकचा विचार होईल. दरम्यान, आता मुंबईची लोकल धावत असली तरी त्यात केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना प्रवेश आहे. आता आपण जर सर्वांसाठी लोकल सुरु केली तर मोठी गर्दी होईल. मुंबई महानगर प्रदेशातून लोक येथे दाखल होतील. त्यामुळे जेव्हा मुंबई महानगर प्रदेशातील परिस्थिती नियंत्रणात येईल तेव्हा मी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्व काही सुरु करण्याची विनंती करेल, असेही चहल यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, चेस द व्हायरस - ट्रेसिंग – ट्रॅकींग – टेस्टींग – ट्रिटिंग या चतु:सूत्रीची अंमलबजावणी यशस्वीपणे व अविरतपणे करणा-या महापालिकेच्या वैद्यकीय साधने असलेल्या वाहनांच्या ताफ्यात तीन वैशिष्ट्यपूर्ण वाहनांचा समावेश झाला आहे. या तीन वाहनांपैकी दोन वाहने ही प्राणवायू सुविधेसाठी आवश्यक असणा-या यंत्रसामुग्रीसह सुसज्ज आहेत. तर तिसरे वाहन हे कोविड चाचणीसाठी आवश्यक असणा-या साधनांनी व क्ष-किरण यंत्रासह सुसज्ज आहे. ही तिन्‍ही वाहने तीन चाकी असून आकाराने छोटी आहेत. ज्यामुळे अरुंद रस्त्यांवर देखील या वाहनांचा उपयोग करणे तुलनेने सुलभ असणार आहे. 
 

Web Title: ... then unlock the whole of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.