Join us

... तर लसीकरण केंद्रे होतील कोरोनाचे सुपर स्प्रेडेर्स - डाॅ. सावंत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 7:51 AM

राज्यातील ६ कोटी ७४ लाख या गटातील नागरिकांना टप्प्याटप्प्याने लस मिळेल असे मत त्यांनी व्यक्त केले. व महाराष्ट्रात दिवसाला कमीत कमी एक लाख नागरिकांचे लसीकरण करण्यास लस उपलब्ध झाल्यास कोरोनाचा वाढता संसर्ग मर्यादित राहू शकेल असे डॉ.दीपक सावंत म्हणाले.

ठळक मुद्देराज्यातील ६ कोटी ७४ लाख या गटातील नागरिकांना टप्प्याटप्प्याने लस मिळेल असे मत त्यांनी व्यक्त केले. व महाराष्ट्रात दिवसाला कमीत कमी एक लाख नागरिकांचे लसीकरण करण्यास लस उपलब्ध झाल्यास कोरोनाचा वाढता संसर्ग मर्यादित राहू शकेल असे डॉ.दीपक सावंत म्हणाले.

मनोहर कुंभेजकर

मुंबई : लसीकरण व कोरोनाचा समूह संसर्ग टाळण्यासाठी मुख्यमंत्री सतत आवाहन करत आहे. पण मार्केट गर्दीमधील आणि भाजीवाल्यांची गर्दी पाहिल्यावर नागरिक स्वतःहून कोरोनाच्या स्वाधीन होत आहे. लसीकरण व्हावे म्हणून नागरिक पहाटेपासून तासन् तास उभे राहून एकमेकांच्या संपर्कात येऊन व सोशल डिस्टन्सिंग न पाळता लसीकरण केंद्रावर तुफान गर्दी करत आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रे  कोरोनाचे सुपर स्प्रेडेर्स होत असल्याने लसीकरण केंद्रावरील गर्दी कमी केली पाहिजे असे मत राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी लोकमतकडे व्यक्त केले. मर्यादित लसींचा साठा, मर्यादित स्टाफ, लस घेतल्यानंतर पुन्हा अर्धा तास लसीकरण केंद्रात थांबवणे या सगळ्या गोष्टींतून कोरोनाचा किती संसर्ग होईल याची कल्पना लसीकरणासाठी जाणाऱ्या प्रत्येकाने करावी असे मत त्यांनी व्यक्त केले. 

राज्यातील ६ कोटी ७४ लाख या गटातील नागरिकांना टप्प्याटप्प्याने लस मिळेल असे मत त्यांनी व्यक्त केले. व महाराष्ट्रात दिवसाला कमीत कमी एक लाख नागरिकांचे लसीकरण करण्यास लस उपलब्ध झाल्यास कोरोनाचा वाढता संसर्ग मर्यादित राहू शकेल असे डॉ.दीपक सावंत म्हणाले.अजून ६५ वर्षांवरील निम्म्या नागरिकांचे लसीकरण बाकी आहे.तसेच यापैकी लस उपलब्ध झाल्यास फॅमिली फिजिशियन मार्फत दुपारच्या वेळात लसीकरण होऊ शकेल, त्यासाठी एसओपी तयार करणे गरजेचे आहे अशी सूचना डॉ.सावंत यांनी केली. तसेच कोविन अँपवर एकाच वेळी होणारी नोंदणीला होणारी झुंबड उडत असल्याने कोविन अँप क्रॅश होत आहे.म्हणून राज्याने पर्यायी अँप निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा. आणि लसीकरण केंद्र ही कोरोनाची संसर्ग केंद्र होणार नाही,निदान आपण व्यवस्थित दिलेक्या वेळेनुसार काळजी घेऊन येथील गर्दी कमी करावी असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लस