Join us

सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव आणल्यास मुख्यमंत्र्यांचा जाहीर सत्कार करू - नितेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 3:50 PM

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरवाच्या प्रस्तावावरून भाजपाने आज विधानसभेत भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला होता...

ठळक मुद्दे अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीदिनी सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामनेसावरकरांबाबत माहिती घेतल्यानंतर त्यांच्याबाबत माझे मत बदलले आहेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावरकांच्या गौरवाचा प्रस्ताव आणल्यास त्यांचा जाहीर सत्कार करू

मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरवाच्या प्रस्तावावरून आज विधानसभेत गदारोळ झाला. दरम्यान, भाजपा आमदार नितेश राणे यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावरकांच्या गौरवाचा प्रस्ताव आणल्यास त्यांचा जाहीर सत्कार करू, असे विधान नितेश राणे यांनी केले आहे.स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरवाच्या प्रस्तावावरून भाजपाने आज विधानसभेत भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांना शिवसेना आणि महाविकासआघाडी सरकारवर टीका केली. मात्र शिवसेना नेते अनिल परब यांनी भाजपाला प्रत्युत्तर देताना सावरकरांबाबत नितेश राणेंचे काय मत आहे हेही विचारा असा टोला लगावला होता.त्यानंतर नितेश राणे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबतची आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केली आहे. स्वातंत्र्यवीर सावकरांबाबत त्यावेळी केलेल्या ट्विटबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो. सावरकरांबाबत माहिती घेतल्यानंतर त्यांच्याबाबत माझे मत बदलले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावरकांच्या गौरवाचा प्रस्ताव आणून दाखवावा. मुख्यमंत्र्यांनी तसा प्रस्ताव आणल्यास त्यांचा जाहीर सत्कार करू, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या 

सावरकरांना भारतरत्न मिळावे म्हणून सर्वांनी प्रयत्न करूया, विधानसभेत अजित पवार यांचे आवाहन

Veer Savarkar: वीर सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव फेटाळला; शिवसेनेनं भाजपाचा डाव उलटवला!दरम्यान, राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे आज पाहायला मिळालं. भाजपाकडून वीर सावरकरांचा गौरव प्रस्ताव सभागृहात मांडण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी फेटाळून लावला. हा प्रस्ताव फेटाळल्याने नाराज झालेल्या भाजपा आमदारांनी गोंधळ घालत सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. 

टॅग्स :नीतेश राणे उद्धव ठाकरेभाजपाशिवसेनाराजकारण