मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मुंबईत एकूण २ लाख ३४ हजार ८१५ मते मिळाली आहेत. मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांपैकी उत्तर पूर्व मतदारसंघातील उमेदवार निहारिका खोंदले यांना सर्वाधिक म्हणजे ६८ हजार २३९ मते मिळाली आहेत.तर, सर्वात कमी मते उत्तर मुंबईचे उमेदवार सुनील थोरात यांना १५ हजार ६९१ मिळाली आहेत. याशिवाय, दक्षिण मुंबईतील आघाडीचे उमेदवार डॉ अनिल कुमार यांना ३० हजार ३४८ मते, उत्तर मध्य मधील उमेदवार अब्दुल रहमान अंजारीया यांना ३३ हजार ७०३ मते, उत्तर पश्चिममधील उमेदवार सुरेश शेट्टी यांना २३ हजार ४२२ मते मिळाली आहेत. दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार संजय भोसले ६३ हजार ४१२ मते मिळवण्यात यशस्वी झाले.वंचित आघाडीच्या यशासाठी प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत अनेक मतदारसंघात प्रचारसभा घेतल्या होत्या. एमआयएमचे मुंबईतील आमदार वारिस पठाण यांनी देखील प्रचारात सहभाग घेतला होता. मात्र राज्याच्या इतर भागात आघाडीला मिळालेल्या मतांच्या तुलनेत मुंबईत फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र आहे.मुंबईत प्रत्येक मतदारसंघात१० हजारपेक्षा जास्त मते नोटा लामुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघात ८२ हजार २७५ मतदारांनी ‘नोटा’ला मतदान केले आहे. मुंबईतील सर्व सहा मतदारसंघामध्ये १० हजार पेक्षा जास्त मतदारांनी नोटा चा पर्याय वापरला आहे. उत्तर मध्य मुंबईत १० हजार ६४७ , उत्तर मुंबईत ११ हजार ९६६, दक्षिण मुंबईत १५ हजार ११५, उत्तर पूर्व मुंबईमध्ये १२ हजार ४६६, उत्तर पश्चिम मुंबई मध्ये १८ हजार २२५ व दक्षिण मध्य मुंबईमध्ये १३ हजार ८३४ जणांनी नोटा वापरला आहे.>१० हजार ४९ टपाली मतदानमुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण १० हजार ४९ टपाली मतदान झाले. त्यामध्ये सवार्धिक टपाली मतदान दक्षिण मुंबईत २११० झाले. त्यानंतर दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघामध्ये १७७२ टपाली मते मिळाली, उत्तर पश्चिम मध्ये १३६६ टपाली मते आली. उत्तर पूर्व मध्ये १७६५ टपाली मते होती. उत्तर मध्य मध्ये १३३३ व उत्तर मुंबईत १७०३ टपाली मतदान झाले. टपाली मतदान मिळवण्यामध्ये देखील शिवसेना व भाजप युतीच्या उमेदवारांचाच वरचष्मा दिसून आला.
वंचित बहुजन आघाडीला मुंबईत २ लाख ३४ हजार ८१५ मते
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 1:20 AM