Join us

राज्यात दिवसभरात काेराेनाचे ५,७६० रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2020 2:14 AM

कोरोनामुक्तीचे प्रमाण ९२.८२ टक्क्यांवर

मुंबई : राज्यात शनिवारी दिवसभरात काेराेनाच्या ५ हजार ७६० रुग्णांचे निदान झाले असून ६२ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या १७ लाख ७४ हजार ४५५ झाली असून बळींचा आकडा ४६ हजार ५७३ झाला आहे.दिवसभरात ४ हजार ८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, आतापर्यंत १६ लाख ४७ हजार ४ जण काेराेनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.८२ टक्क्यांवर पोहोचले आहे.सध्या राज्यात ७९ हजार ८७३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात नोंद झालेल्या ६२ मृत्यूंमध्ये मुंबई १७, नाशिक ४, नाशिक मनपा ३, पुणे ३, पुणे मनपा ८, पिंपरी-चिंचवड मनपा १, सोलापूर १०, सोलापूर मनपा २, सातारा ७, अकोला ३, अकोला मनपा १, यवतमाळ १, बुलडाणा २ या रुग्णांचा समावेश आहे.

राज्यात ५ लाख २२ हजार ८१९ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४ हजार ५६९ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १ लाख २० हजार ४७० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७.५३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

अशी आहे रुग्णसंख्या१० नोव्हेंबर     ३७९११५ नोव्हेंबर     २५४४२० नोव्हेंबर     ५४६०

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्या