राज्यात काेराेनाचे ५८ हजार ९२४ नवे रुग्ण, ३५१ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:07 AM2021-04-20T04:07:05+5:302021-04-20T04:07:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात मागील काही दिवसांच्या तुलनेत दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूंची संख्या कमी झाली आहे, त्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात मागील काही दिवसांच्या तुलनेत दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूंची संख्या कमी झाली आहे, त्यामुळे किंचित दिलासादायक चित्र आहे. राज्यात दिवसभरात ५८ हजार ९२४ रुग्ण आणि ३५१ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३८ लाख ९८ हजार २६२ झाली असून बळींचा आकडा ६० हजार ८२४ झाला आहे. सध्या ६ लाख ७६ हजार ५२० रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
राज्यात सोमवारी ५२ हजार ४१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ३१ लाख ५९ हजार २४० रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.०४ टक्के झाले असून मृत्युदर १.५६ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ४० लाख ७५ हजार ८११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.१९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३७ लाख ४३ हजार ९६८ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर २७ हजार ८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
राज्यातील दैनंदिन रुग्ण आलेख
तारीख रुग्णसंख्या
१९ एप्रिल ५८९२४
१८ एप्रिल ६८६३१
१७ एप्रिल ६७१२३
१६ एप्रिल ६३७२९
१५ एप्रिल ६१६९५
१४ एप्रिल ५८९५२