राज्यभरात ७ पोलीस कोरोनाबाधित, ४७ पोलीस होम क्वॉरंटाइन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 03:46 AM2020-04-14T03:46:47+5:302020-04-14T03:47:03+5:30

४७ पोलीस होम क्वॉरंटाइन, मुंबई पोलिसांचा सर्वाधिक समावेश

There are 7 police coronas across the state, 47 police home quarantine | राज्यभरात ७ पोलीस कोरोनाबाधित, ४७ पोलीस होम क्वॉरंटाइन

राज्यभरात ७ पोलीस कोरोनाबाधित, ४७ पोलीस होम क्वॉरंटाइन

Next

मुंबई : आॅनड्युटी २४ तास कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनाही कोरोना झाल्याने कुटुंबियाची धास्ती वाढली. राज्यभरात ७ पोलीस कोरोनाबाधित झाले असून यात दोन अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. तर ४७ पोलिसांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. यात मुंबई पोलीस दलातील सर्वाधिक पोलिसांचा समावेश आहे.

२३ मार्चच्या मध्यरात्रीपासून संपूण देशात तीन आठवड्यांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला. लॉकडाऊनसह राज्याराज्यांमध्ये जमावबंदी आणि संचारबंदी आदेश जारी करण्यात आले. महाराष्ट्रात जमाबंदी आदेश लागू आहेत. या आदेशांच्या अंमलबजावणीसह विविध बंदोबस्त, कोरोना रुग्णाची माहिती घेणे, सील केलेल्या ठिकाणांवरील बंदोबस्तासह विविध कामांची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर आहेत.

आधीच कोरोनाने पोलीस वसाहतीत संक्रमण केल्याने कुटुंबियाच्या काळजीत भर पडली. अशात राज्यभरात मुंबईसह ठाणे शहर पोलीस दलातील २ पोलीस अधिकाऱ्यांसह ५ पोलीस अमलदारांना (४ मुंबई पोलीस तर १ मुंबई रेल्वे पोलीस) कोरोनाची लागण झाली आहे. अशात एकूण ७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर ४७ पोलिसांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले आहेत. ही २२ मार्च ते १३ मार्चच्या पहाटेपर्यतची आकडेवारी आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असलेल्या मुंबईतील वाढत्या घटनांमुळे मुंबई पोलीस वसाहतींमध्ये कोरोनाची दहशत वाढत आहे तर दुसरीकडे आदेशांची अंमलबजावणी करणाºया पोलिसांवर राज्यात अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आले. त्याबाबत सोमवारी पहाटेपर्यंत ७३ गुन्हे दाखल करत १६१ जणांना अटक करण्यात आली आहे.

नायगाव वसाहतीतील दोन इमारती सील
बांगूरनगर पोलीस ठाण्यातील एका पोलीस शिपायाला कोरोनाची लागण झाल्याने त्याला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. ते नायगांव परिसरात राहण्यास असल्याने नायगाव पोलीस वसाहतीतील दोन इमारती सील करण्यात आल्या आहेत. यापुर्वी वरळी आणि बोरीवली पोलीस वसाहतील इमारती सील करण्यात आल्या आहेत.

Web Title: There are 7 police coronas across the state, 47 police home quarantine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.