राज्यात काेराेनाचे ७१ हजार ३६५ सक्रिय रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:25 AM2020-12-16T04:25:18+5:302020-12-16T04:25:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात दिवसभरात ४ हजार ३९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण १७ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात दिवसभरात ४ हजार ३९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण १७ लाख ६६ हजार १० रुग्ण कोरोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.६० टक्के असून मृत्युदर २.५६ टक्के आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या ७१ हजार ३६५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात मंगळवारी ३ हजार ४४२ रुग्णांचे निदान झाले असून ७० मृत्यूंची नाेंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या १८ लाख ८६ हजार ८०७ झाली आहे. तर बळींचा आकडा ४८ हजार ३३९ इतका झाला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १८ लाख ६ हजार ८०८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५.९८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख २४ हजार ५९ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४ हजार ३१६ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
.....................