"पंतप्रधान मोदींवरही आरोप होतात, त्यांनाही राजीनामा द्यायला सांगा आणि चौकशी करा", नाना पटोलेंचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 05:23 PM2021-03-25T17:23:14+5:302021-03-25T17:24:51+5:30

Nana Patole: आरोप तर पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही (Narendra Modi) केले जातात. मग त्यांचाही राजीनामा घ्या आणि त्यांचीही चौकशी करा, असा खोचक टोला पटोले यांनी लगावला आहे.

there are allegations on Prime Minister Modi also so ask him to resign and do inquiry slams Nana Patole | "पंतप्रधान मोदींवरही आरोप होतात, त्यांनाही राजीनामा द्यायला सांगा आणि चौकशी करा", नाना पटोलेंचा खोचक टोला

"पंतप्रधान मोदींवरही आरोप होतात, त्यांनाही राजीनामा द्यायला सांगा आणि चौकशी करा", नाना पटोलेंचा खोचक टोला

googlenewsNext

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या आरोपांप्रकरणी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपनं लावून धरली आहे. त्यावर आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जोरदार टीका केली. "आरोप तर पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही केले जातात. मग त्यांचाही राजीनामा घ्या आणि त्यांचीही चौकशी करा", असा खोचक टोला पटोले यांनी लगावला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. 

फडणवीस म्हणजे काय केंद्रीय तपास यंत्रणा आहे का?, नाना पटोले संतापले; दिला सूचक इशारा

"अंबानी आणि अदानीसाठी केंद्र सरकार काम करतंय हे सामान्य जनता बोलतेय. मग आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राजीनामा द्यायला हवा आणि त्यांचीही चौकशी करायला हवी. लोकशाहीमध्ये जनता सर्वात मोठी असते असं आम्ही मानतो. ते लोक मानतात की नाही माहित नाही", असं नाना पटोले म्हणाले.

फडणवीसांच्या मंत्र्यांवरही आरोप झालेले
"देवेंद्र फडणवीस जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांच्याही मंत्र्यांवर आरोप झाले होते. त्यावेळी फडणवीसांनी राजीनामे घेतले का? फडणवीसच सर्वांना क्लिन चिट देत फिरत होते आणि तेच न्यायाधीश बनत होते", असा टोला पटोले यांनी लगावला. भाजपचे लोक दुधानं धुतलेले असते तर त्यांना बोलण्याचा अधिकार होता. पण हे लोक चिखलात फसलेले लोक आहेत, असाही घणाघात पटोले यांनी केला. 
 

Web Title: there are allegations on Prime Minister Modi also so ask him to resign and do inquiry slams Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.