भारतात आढळतात आठ प्रजातींच्या चिमण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:05 AM2021-03-20T04:05:42+5:302021-03-20T04:05:42+5:30

२० मार्च जागतिक चिमणी दिवस; निसर्ग मित्र अवसरे यांनी बालमित्रांना करून दिली ओळख लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भारतात ...

There are eight species of sparrows found in India | भारतात आढळतात आठ प्रजातींच्या चिमण्या

भारतात आढळतात आठ प्रजातींच्या चिमण्या

Next

२० मार्च जागतिक चिमणी दिवस; निसर्ग मित्र अवसरे यांनी बालमित्रांना करून दिली ओळख

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भारतात आठ प्रजातींच्या चिमण्या आढळतात. आपल्या लहानपणी चिऊ-काऊच्या गोष्टीमधील चिमणीचे नाव हाऊस स्पॅरो असे आहे. यातील काही चिमण्या इतर राज्यांत आढळतात. जंगलात, डोंगरकपारीत, वाळवंटात, तसेच बर्फाळ प्रदेशातही चिमण्यांच्या काही प्रजाती आढळतात. भारतात आढळणाऱ्या आठ प्रजातींच्या चिमण्यांची ओळख निसर्ग मित्र विजय अवसरे यांनी बालमित्रांना चित्रांच्या माध्यमातून करून दिली आहे.

चिमणी हा कीटकांवर नियंत्रण ठेवणारा निसर्गातील एक महत्त्वाचा घटक आहे. आता मुंबई शहरात चिमणी दिसण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. मेट्रोचे खोदकाम, त्याचा होणारा मोठा आवाज व त्यामुळे होणारे ध्वनिप्रदूषण यामुळे चिमण्या बिथरतात; ज्या ठिकाणी शांतता असेल अशा ठिकाणी स्थलांतर करतात.

मुंबई शहरालगत उपनगरात असणाऱ्या पिंपळाची, बोरीची झाडे यावर चिमण्या रात्री निवारा करताना आढळतात. म्हणजे एका झाडावर शेकडो चिमण्या रात्र काढतात. सकाळी पुन्हा उडून जातात. पूर्वी जुनी घरे व बऱ्याच प्रमाणावर चाळी असल्याने चिमण्यांना सहज आसरा मिळत असे. आता चाळी व जुने वाडे तोडून तिथे गगनचुंबी इमारती, टाॅवर बांधण्यात आले आहेत. त्यामुळे चिमण्यांना राहायला आसरा उरला नाही. मोबाइल टाॅवर, इलेक्ट्रिक टाॅवर यामधून निघणाऱ्या विद्युत तरंगांमुळेही चिमण्या घाबरून स्थलांतर करतात. याच चिमण्यांची ओळख अवसरे यांनी चित्रांच्या माध्यमातून करून दिली.

Web Title: There are eight species of sparrows found in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.