क्रॉस मैदानावर ५ फेब्रुवारीपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 05:26 AM2018-02-03T05:26:17+5:302018-02-03T05:26:42+5:30

मोफत व कोणतीही अट न घालता सार्वजनिक जागेवर कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी दिली जात असल्याने, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी फैलावर घेतले. सरकारने काळाघोडा फेस्टिव्हलचा सांस्कृतिक कार्यक्रम क्रॉस मैदानावर आयोजित करण्यास परवानगी दिल्याने, उच्च न्यायालयाने सरकारला फटकारत, ५ फेब्रुवारीपर्यंत या मैदानावर कोणताही कार्यक्रम आयोजित न करण्याचे निर्देश सरकारला दिले.

There are no cultural events on the cross ground until 5 February | क्रॉस मैदानावर ५ फेब्रुवारीपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम नाहीत

क्रॉस मैदानावर ५ फेब्रुवारीपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम नाहीत

Next

मुंबई -  मोफत व कोणतीही अट न घालता सार्वजनिक जागेवर कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी दिली जात असल्याने, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी फैलावर घेतले. सरकारने काळाघोडा फेस्टिव्हलचा सांस्कृतिक कार्यक्रम क्रॉस मैदानावर आयोजित करण्यास परवानगी दिल्याने, उच्च न्यायालयाने सरकारला फटकारत, ५ फेब्रुवारीपर्यंत या मैदानावर कोणताही कार्यक्रम आयोजित न करण्याचे निर्देश सरकारला दिले.
दक्षिण मुंबईतील काळाघोडा परिसर ‘शांतता क्षेत्र’ म्हणून जाहीर केल्यानंतर, काळाघोडा फेस्टिव्हलचा सांस्कृतिक कार्यक्रम काही वर्षांपासून क्रॉस मैदानात घेण्यात येतो. मात्र, उच्च न्यायालयाने या आधी दिलेल्या निर्देशानुसार, क्रॉस मैदानात कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी आयोजकांना न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे काळाघोडा फेस्टिव्हलच्या आयोजकांनी क्रॉस मैदानामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यासाठी न्यायालयात परवानगीकरिता याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. प्रदीप देशमुख यांच्या खंडपीठासमोर होती. शनिवारी या मैदानावर तबलावादक उस्ताद झाकीर हुस्सेन यांचा कार्यक्रम होणार होता.
३० जानेवारी रोजी मुंबई जिल्हाधिकाºयांनी आयोजकांना क्रॉस मैदानावर कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी दिली. जिल्हाधिकाºयांनी सारासार विचार न करता कार्यक्रमाला परवानगी दिली आहे, असे न्यायालयाने म्हटले.
सरकारने दिलेली परवानगी मागे घेत नव्याने परवानगी द्यावी. मात्र, त्यात कारणमीमांसा करावी, असे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले. त्यावर सरकारी वकील एस. यू. कामदार यांनी सरकार ५ फेब्रुवारी रोजी नव्याने आदेश काढेल, असे न्यायालयाला सांगितले. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी शनिवारी झाकीर हुस्सेन यांचा कार्यक्रम आयोजित केला असल्याने परवानगी द्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली.
सरकारचा आदेशच चुकीचा असेल, तर आम्ही परवानगी कशी देणार? सरकार, महापालिका आणि न्यायालय तुमच्याच (आयोजक) बाजूने निकाल देईल, असे तुम्ही गृहीत धरू नका, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने आयोजकांनाही धारेवर धरले.

सोमवारी सुनावणी
महापालिकेच्या विकास आरखड्यानुसार, क्रॉस मैदान मनोरंजन पार्क आहे. त्यामुळे येथे सामाजिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाच परवानगी दिली जाऊ शकते. सरकारने या सर्व गोष्टींचे समर्थन करू नये, असे म्हणत न्यायालयाने या याचिकेवर ५ फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवली आहे.

Web Title: There are no cultural events on the cross ground until 5 February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.